कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ थांबवावी

कृषिपंपाचे वीज कनेक्शन कापणे बंद करावे, रात्रीचे भारनियमन बंद करावे या मागणीचे निवेदन महावितरण कंपनीचे सहायक अभियंत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
The power outage of agricultural pumps should be stopped immediately
The power outage of agricultural pumps should be stopped immediately

हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे वीजबिल थकीत असल्याच्या कारणावरून वीजकनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महावितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज कनेक्शन कापणे बंद करावे, रात्रीचे भारनियमन बंद करावे या मागणीचे निवेदन महावितरण कंपनीचे सहायक अभियंत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. 

हिंगणा तालुक्यात रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतात हरभरा, गहू, तूर यासह भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेणे सुरू आहे. शेतात पिके डौलत असताना महावितरण कंपनीने वीजबिल थकीत असल्याच्या कारणावरून वीज कनेक्शन कापणे सुरू केले  आहे. 

शेतकऱ्यांवर हा एक प्रकारे अन्याय आहे. आता पिकांना खऱ्या अर्थाने कृषी पंपाद्वारे पाणी देण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन कापू नये. तसेच रात्रीच्या वेळी शेतात पिकाला पाणी ओलण्यात येते. मात्र, कंपनीने रात्रीच्या वेळी भारनियमन सुरू केले आहे. हे भारनियमन बंद करण्यात यावे, वीजबिल भरण्यासाठी चार ते पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीचे निवेदन महावितरण कंपनीचे सहायक अभियंता नाईक यांना देण्यात आले. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, रश्मी कोटगुले, पंचायत समिती सभापती रूपाली खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, सदस्य सुनील बोंदाडे, उमेश राजपूत, अनसूया सोनवणे, पौर्णिमा दीक्षित, राजेंद्र उईके, उपसभापती सुषमा कावळे, बाजार समिती सभापती बबन आव्हाले, उपसभापती योगेश सातपुते, सुरेखा फुलकर, आशीष पुंड, सरपंच उषा बावणे, धनंजय गिरी, पंकेश तिडके, नितीन बोडणे, आनंदराव ढगे, युसूफ खान पठाण, राजू तेलंग, संतोष ठाकरे, तीर्थराज पन्नासे, मोरेश्‍वर बोबडे, अनिल लोहे, यादवराव ठाकरे यांच्यासह हिंगणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांमागे संकटांची मालिक सुरू असताना त्याच्या शेतातील वीज कापणे ही त्याच्यावर अन्यायाची बाब आहे. रब्बीचा हंगाम सुरू असताना त्यांच्यावर आघात करणे चुकीचे आहे. वीजजोडण्या कापणे थांबविले नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू.  - उज्ज्वला बोढारे, महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com