‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न भरल्याने कारवाई 

थकबाकी भरण्याची नोटीस बजावूनही वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करून थकबाकी वसुलीसाठीचा फंडा वापरला, मात्र तो फंडा तसाच त्यांच्‍यावर उलटला.
Power outage in 'tehsil'; Action for non-payment of arrears
Power outage in 'tehsil'; Action for non-payment of arrears

नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी भरण्याची नोटीस बजावूनही वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करून थकबाकी वसुलीसाठीचा फंडा वापरला, मात्र तो फंडा तसाच त्यांच्‍यावर उलटला. महसूल विभागाची विविध करांची लाखोंची थकबाकी वीज वितरण कंपनीकडे थकीत आहे. ती भरली नाही म्हणून थेट तहसीलदार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फौजफाट्यासह पोचले. त्यांनीही थकीत रक्कम न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकून जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे ‘तू शेर तर मी सव्वाशेर’ अशा प्रकारचा कलगीतुरा या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये रंगला आहे. दरम्यान, हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात व तेथून वरिष्ठ अधिकारी आणि आता समझोत्यासाठी थेट जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्‍या कोर्टात पोहोचले आहे. उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघाला नव्हता. दोन्ही विभागांकडून खलबते सुरू होती.  सध्या वीज वितरण कंपनीने थकीत बिलाच्या रक्कम वसुलीसाठी कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. थकबाकी न भरणाऱ्या वीजग्राहकांवर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयास थकीत वीजबिलाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले होते. तसे पत्रही देण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या म्हणण्यानुसार थकीत बिलाची रक्कम भरण्यासाठी कोशागार विभागाकडे प्रक्रिया सुरू झाली होती. तेथे दोन दिवस उशीर झाला. त्यामुळे वीजबिल भरले गेले नाही. त्यामुळे महसूल विभागाने वीज वितरण कंपनीला पुन्हा दोन दिवसांची संधी मागितली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन जात तहसील कार्यालयाची वीज तोडली. त्यामुळे तहसील कार्यालय अंधारात बुडाले. तहसील कार्यालयातील कामे विजेअभावी ठप्प झाली.  हे प्रकरण तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे गेले. त्यांनीही शेवटी वीज वितरण कंपनी जर त्यांच्या थकीत रकमेसाठी वीज खंडित करत असेल तर आपल्या विभागाचीही सुमारे सात लाखांची महसुलाची रक्कम थकीत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी थेट तहसीलदार सकाळी दहाच्या सुमारास वीज वितरण कार्यालयात आपला फौजफाटा घेऊन गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com