`कोयने`च्या पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती संकटात

`कोयने`च्या पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती संकटात
`कोयने`च्या पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती संकटात

कोयनानगर, जि. सातारा : सध्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे कोयनेच्या पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती संकटात आली आहे. एक हजार मेगावॉट क्षमतेच्या चौथा टप्पा केव्हाही बंद पडू शकतो. विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्याचे आदेश कोयना जलविद्युत प्रकल्पाला वीज कंपनीने दिले आहेत. तरीही अत्यल्प पाणीसाठ्यामुळे कोयनेतील वीजनिर्मिती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 

कोयना धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यातील ३५ टीएमसी पाणीसाठा वापरला गेला आहे. सिंचन व वीजनिर्मितीसाठी ९० टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला. या धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी जादा पाणीसाठा देण्यात येत असल्याने धरणात सध्या २८.०६ टीएमसी पाणीसाठाच शिल्लक आहे. कमी झालेल्या पाणीसाठ्यामुळे पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पावर संक्रांत येण्याची शक्‍यता आहे. त्यातून एक हजार मेगावॉट क्षमतेच्या चौथा टप्प्याला घरघर लागली आहे. 

कोयना धरणातून पूर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून दररोज दोन हजार १००, तर आपत्कलीन विमोचक्र दरवाजातून एक हजार असे एकून तीन हजार १०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचनासाठी आतापर्यंत ३५.२३ टीएमसी पाण्याचा वापर झाला, तर पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी ५५.३२ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. धरणात सध्या २०७२.०९ फूट (२८.०६ टीएमसी) पाणीसाठा आहे. पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी ९.०४ टीएमसी पाणी वापर शिल्लक आहे.

आधीजल भुयार विस्तारीकरणाचा पर्याय  कोयना प्रकल्पातील एक हजार मेगावॉट क्षमतेचा चौथा टप्पा बंद पडण्याची शक्यता आहे. त्याला पर्याय असणारा आधीजल भुयाराचे विस्तारीकरण केलेला टप्पा ४ - ब तातडीने सुरू करावा, अशी मागणी महानिर्मिती कंपनीने केली आहे. त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या यांत्रिकी विभागाकडून लवकरच हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com