Agriculture news in marathi By the power of science, spirituality, the country will become a universe: Dr. Bhatkar | Page 2 ||| Agrowon

विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्‍वगुरू बनेल: डाॅ. भटकर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व अध्यात्माच्या ताकदीवर एकविसाव्या शतकात जगासमोर भारत विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असा आत्मविश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. 

कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार पुणे विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि एक लाख रोख रक्कम असे होते. या वेळी डॉ. भटकर बोलत होते.

कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व अध्यात्माच्या ताकदीवर एकविसाव्या शतकात जगासमोर भारत विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असा आत्मविश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. 

कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार पुणे विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि एक लाख रोख रक्कम असे होते. या वेळी डॉ. भटकर बोलत होते.

डॉ. भटकर म्हणाले, की जगाच्या पाठीवर अनेक संस्कृत्या लयाला गेल्या; परंतु भारतीय संस्कृती ही आजही नुसती तग धरून नाही तर पूर्ण क्षमतेने वाढत आहे. कारण ती उच्च कोटींच्या ज्ञानावर आणि अध्यात्मावर आधारित आहे. एक क्रांती स्वातंत्र्य सैनिकांनी घडवली आणि दुसरी क्रांती विज्ञानाची झाली. यानंतर मानवी आयुष्य सुखकर झाले. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याचा जर अभ्यास झाला तर भारत विश्वगुरू होईल. जगात जे काही शास्त्रज्ञ शोध कार्यात आहेत त्यातील बहुतांश आपल्या देशातील आहेत याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि नवीन पिढीने याचा बोध घेणे आवश्‍यक आहे. 

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘डॉ. विजय भटकर यांच्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे, देशाची संस्कृती ज्ञानावर आधारित असल्याने आज आपण वैज्ञानिक प्रगत आहोत.’’

या वेळी क्रांतिअग्रणी पुरस्काराची भूमिका मांडताना क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, की या व्याख्यानमालेमुळे लोकप्रबोधनाचा जागर चालू केला. यातून क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना अपेक्षित असा समाज घडेल अशी अपेक्षा आहे.

क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, प्रकाश लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, बाळासाहेब पवार, महेंद्र लाड, जे. के. बापू जाधव, सचिन कदम, बाबासाहेब पाटील, उपसभापती अरुण पवार, छायादेवी पवार, प्रमिला लाड, अलका लाड, सुनंदा लाड, सरपंच प्रमिला पुजारी आणि परिसरातील अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानपत्र वाचन प्रा. नवनाथ गुंड यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जयवंत आवटे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले, तर आभार जी. के. जाधव यांनी मानले.


इतर ताज्या घडामोडी
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी...नाशिक : ‘‘शेती व शेतीच्या व्यवस्थापनात महिलांचे...
बर्ड फ्लूच्या सूचनांचे पालन करावे ः पंकेअंबाजोगाई, जि. बीड : ‘‘प्रशासनाकडून वेळोवेळी...
वायनरी, पैठणी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू...नाशिक : ‘‘पुणे विद्यापीठाच्या नाशिक...
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
शारदानगरमध्ये आयआयटी तंत्रापासून...पुणे : ‘कृषिक २०२१’ निमित्ताने बारामतीच्या...
वातावरणपूरक संत्रा जातींचे संवर्धन करा...अकोला : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः...
कारखान्यांनी सीएनजी गॅसही तयार करावा :...शिराळा, जि. सांगली : राज्याला समृद्धीच्या...
कायदे मागे घेण्यास भाग पाडू : किसान सभानाशिक: केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग...
अण्णांनी उपोषण करू नये : फडणवीसराळेगणसिद्धी, जि. नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा...
‘शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करा’पुणे ः ‘‘राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे...
भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही...नगर : भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत...
खानदेशात कडब्याची आवक वाढणारजळगाव ः खानदेशात यंदा रब्बी हंगामाची पेरणी...
‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा...सोलापूर : शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा...
भूजल स्रोत बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर...पुणे ः पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण...
हमाल नसतानाही मनमानी वसुली; शेतकऱ्याचा...नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न...
बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा...सोलापूर ः अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका...
शेतकरी नियोजन (पीक : हरभरा)सध्या पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तापमानात वाढ होण्याची शक्यताकमाल तापमान विदर्भात ३.१ अंश सेल्सिअसने, तर कोकण...