सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या वीज पुरवठ्याला फटका

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यात महावितरणचे सात हजार ७४२ इतके खांब पडले आहेत. यापैकी ८७० खांब आतापर्यंत उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. उर्वरित ६८७२ खांब उभे करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे.
Power supply to 30,000 agricultural pumps hit in Solapur district
Power supply to 30,000 agricultural pumps hit in Solapur district

सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यात महावितरणचे सात हजार ७४२ इतके खांब पडले आहेत. यापैकी ८७० खांब आतापर्यंत उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. उर्वरित ६८७२ खांब उभे करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे.  

या आपत्तीमुळे जवळपास २९ हजार ४७३ शेतीपंपांची वीज बाधित झाली आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. 

प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, संजवाड (ता. दक्षिण सोलापूर) येथील वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे सुरू झाल्याची माहिती नाळे यांनी दिली. नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन लागणारे खांब, ऑइल व इतर साहित्याची उपलब्धता महावितरणने पुरेशा प्रमाणात केली आहे. 

या सर्व भागातील  वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामे ठिकठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहेत. भीमा, सीना या नद्यांच्या काठावर असलेल्या वीज यंत्रणेला सर्वाधिक फटका बसला आहे. हजारो रोहित्र, विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत.

यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जिवाचे रान करीत आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी महावितरण पुणेचे प्रभारी प्रादेशिक संचालक नाळे यांनी २२ व २३ ऑक्‍टोबरला जिल्ह्यात आले होते. औराद येथील उपकेंद्रालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत बारामतीचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com