उच्चदाब प्रणालीने कृषिपंपांना विद्युतपुरवठा

उच्चदाब प्रणालीने कृषिपंपांना विद्युतपुरवठा
उच्चदाब प्रणालीने कृषिपंपांना विद्युतपुरवठा

नाशिक  : कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीची (एचव्हीडीएस) कामे गतीने सुरू असून, महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ७ हजार ७८ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे, अशी माहिती नाशिक महावितरण परिमंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली.  उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. विद्युतपुरवठा खंडित होण्याच्या अडचणीतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर पाहणी करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक शहर मंडळात १३८५, मालेगाव मंडळात २७९५ तर अहमदनगर जिल्ह्यात २८९८ अशी एकूण नाशिक परिमंडळातील एकूण ७,०७८ शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. नाशिक परिमंडळात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता जवळपास ४९० कोटींचे कार्यादेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. या प्रणालीनुसार शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १०, १६ व २५ केव्हीए क्षमतेची रोहित्रे लागणार आहेत.  रोहित्राची डिझाइन व टाइप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान आणि साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब झालेला आहे; मात्र, राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com