Agriculture News in Marathi Power supply smooth To bear in Indapur | Agrowon

वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात धरणे 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार कृषीपंपाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने बंद केला आहे. याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर वीज वितरण कार्यालयावर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.

पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार कृषीपंपाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने बंद केला आहे. याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर वीज वितरण कार्यालयावर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. 

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने गेल्या ११ दिवसांपासून पूर्णपणे खंडित केला असल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनी विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महावितरण कंपनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करत असून कृषिपंपाची वीज देखील खंडीत केली आहे. हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे.

जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिली, 
दरम्यान, धरणे आंदोलना दरम्यान शनिवारी (ता.२७) रात्री पाटील यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसोबत जेवण केले. आजच्या रविवार (ता.२८) दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच होते. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

बारामती परिमंडलातील ६ हजार रोहित्रे बंद 
बारामती परिमंडलातील सहा तालुक्यांमधील ६६ हजार कृषिपंपाची वीज बंद करण्यात आली असून, सुमारे ६ हजार रोहित्रे बंद असल्याचे वीज वितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या पंपाची सुमारे दीड हजार कोटींची थकबाकी असून, ५० टक्के सवलती योजनेतील ही रक्कम ७५७ कोटी एवढी आहे. सहा तालुक्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौड, शिरुर, भोर, पुरंदरचा समावेश आहे. 


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...