`नामको`त प्रगती पॅनलची सरशी

`नामको`त प्रगती पॅनलची सरशी
`नामको`त प्रगती पॅनलची सरशी

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या दि. नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी माजी संचालकांकडेच बॅँकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपविल्या आहेत. माजी आमदार वसंत गिते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने २१-० असा दणदणीत विजय मिळवला.

शर्थीचे प्रयत्न करूनही सहकारला मतदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तर बागमार यांचा वारस म्हणून मैदानात उतरलेल्या अजित बागमार यांच्या नेतृत्वाखालील ‘नम्रता’लाही मतदारांनी साफ नाकारले.

अंतिम निकालानुसार, सोहनलाल भंडारी (२९,०५४), महेंद्र बुरड (२५,६९७), भानुदास चौधरी (२४,५५२) शिवदास डागा (२८,१५९), प्रकाश दायमा (२८,८६५), संतोष धाडीवाल (२५,३११), हेमंत धात्रक (२९,१५२), गणेश गिते (२६,६८९), वसंत गिते (३२,४६८), अविनाश गोठी (२७,०२४), कांतीलाल जैन (२६,९३०), हरिष लोढा (२६,८०५), सुभाष नहार (२७,०१३), नरेंद्र पवार (२६,४३२), प्रफुल्ल संचेती (२६,५६८), विजय साने (२६,५७३), अशोक सोनजे (२४,९८३), रंजन ठाकरे (२६,८९०) याप्रमाणे मते मिळाली. 

 महिला गटात प्रगती पॅनलच्या शोभा छाजेड (३४,१०८) आणि रजनी जातेगावकर (३०,८१५) यांनी बाजी मारली. अनुसूचित जाती-जमाती गटात प्रगतीचे प्रशांत दिवे (३१,१७२) विजयी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com