‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांच्या इसापूर धरणात उड्या

‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांच्या इसापूर धरणात उड्या
‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांच्या इसापूर धरणात उड्या

शेंबालपिंप्री, जि. यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बोरी (चातारी) येथील नदीपात्रात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. २५) सकाळी साडेसातदरम्यान इसापूर धरणात उड्या घेतल्या.  

उमरखेड तालुक्यातील बोरी (चातारी) येथील पैनगंगा नदीपात्रात गेल्या सात दिवसांपासून विदर्भ व मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकरी धरणे देत आहेत. परिसरातील गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांची चारा पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. सिंचनासाठी पाणी नाही. त्यामुळे रब्बी व उन्हाळी पिके धोक्यात आली आहे. पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. अशा परिस्थितीत पैनगंगा नदीपात्रातून पाणी सोडावे, त्यासाठी नदीला तिसरा कालवा घोषित करावा, अशी मागणी आंदोलक करीत आहे. परंतु, शासन व प्रशासन नियमाचा खोडा तयार करीत आहेत.

गेल्या सात दिवसांपासून शासन या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन तीव्र केले. त्यांच्या मार्गदर्शनात ‘प्रहार’चे संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यांनी बोरी चातारी गाठून आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास २४ तासांत उड्या घेण्याचा इशारा प्रशासनास दिला होता. त्यानुसार ‘प्रहार’च्या कार्यकर्यांच्या ताफा शुक्रवारी (ता. २२) धरणाच्या दिशेने निघाला असता त्यांना इसापूर धरणाच्या तीन किलोमीटर अलीकडेच पोलिसाकडून अडविण्यात आले. मात्र, पोलिसांना गुंगारा देत कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळीच इसापूर धरण गाठले व धरणातील पाण्यात उड्या मारल्या. मात्र याठिकाणी पोलिस बंदोबस्त नव्हता. जागोजागी पोलिस बंदोबस्त असताना व पोलिसांचा गुप्तचर विभाग सतर्क असताना कार्यकर्त्यांनी धरण गाठलेच कसे असा प्रश्न पोलिसांसह नागरिकांना पडला आहे.

या आंदोलनात ‘प्रहार’चे संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, यवतमाळ जिल्हा प्रमुख विलास पवार, उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, रियाज पारेख, महागाव तालुकाप्रमुख पवन धरणकर, शहरप्रमुख रानू कुरेशी, शेखर माहूरे, सागर डोंगरे, अभिजीत कांबळे, नीलेश खंदारे, सय्यद माजिद, विठ्ठल देशमुख, गजानन ठाकरे, अनिल पाटिल कदम, बाळू पाटील शिरपुले, गणेश कदम, सुभाष देशमुख आदी कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com