Agriculture news in marathi, Prahar an agitation will for agricultural pumps | Agrowon

कृषिपंपांसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

भंडारा ः आधारभूत खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच वीज वितरण कंपनीकडून थकीत बिलापोटी कृषिपंपांची वीज कापली जात आहे. यामुळे रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्‍न गंभीर झाल्याचा आरोप करीत भाजप तसेच प्रहार जनशक्‍ती पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

भंडारा ः आधारभूत खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच वीज वितरण कंपनीकडून थकीत बिलापोटी कृषिपंपांची वीज कापली जात आहे. यामुळे रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्‍न गंभीर झाल्याचा आरोप करीत भाजप तसेच प्रहार जनशक्‍ती पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

खरीप हंगामातील पिकांची कापणी व मळणी पूर्ण झाली आहे. धान कापणी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या मदतीने सिंचन करून रब्बी लागवडीवर भर दिला आहे. गेल्या काही हंगामापासून पिकावर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादकता झाली नाही. त्याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या देयकांचा भरणा करता आला नाही. अशा स्थितीत राज्य सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु, वीज वितरण कंपनीकडून थकीत देयकापोटी कृषिपंपांची वीज खंडित करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. 

या विरोधात प्रहार जनशक्‍ती पक्षाकडून लाखांदूर येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा उपप्रमुख धनराज हटवार, विधानसभा प्रमुख चंद्रशेखर टेंभूर्णे, तालुका प्रमुख प्रकाश नाकतोडे यांच्या नेतृत्वात हे किसान जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकाराचा भाजपनेही निषेध केला आहे. 


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...