Agriculture news in marathi Of 'Prahar' in the character of 'Girna' Jalasamadhi movement | Agrowon

‘गिरणा’ पात्रात ‘प्रहार’चे जलसमाधी आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

नाशिक : खासगी मच्छिमाराचा ठेका रद्द करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक मच्छिमारांनी सोमवारी (ता. १३) गिरणा धरण पात्रात जलसमाधी आंदोलन केले.

नाशिक : गिरणा धरणामध्ये मासेमारीचा ठेका दिल्यामुळे मालेगाव व नांदगाव तालुक्यातील स्थानिक मच्छिमार बेरोजगार झाले आहेत. ठेकेदाराकडून पाण्यात रासायनिक द्रव्य टाकण्यात आले. त्यामुळे जलचर मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. तसेच ५६ खेड्यांतील पाणी पुरवठा व मालेगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी मच्छिमाराचा ठेका रद्द करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक मच्छिमारांनी सोमवारी (ता. १३) गिरणा धरण पात्रात जलसमाधी आंदोलन केले.

आंदोलक जलसमाधी आंदोलन करत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजीत राजपूत व तालुका पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. या मागणीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. मंगळवारी (ता. १४) तहसील कार्यालयात स्थानिक मच्छिमार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करु, असे आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले.

आंदोलनकर्ते पाण्यात ठाण मांडून होते. ठेकेदाराने आणलेल्या परप्रांतीय कामगारांकडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ठेकेदार परप्रांतीय असल्याने स्थानिक मच्छिमारांना मारहाण, खोटे गुन्हे दाखल करणे, दहशतीचा अवलंब करतो. ठेका रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

प्रहार जनशक्तीचे मालेगाव तालुका अध्यक्ष शेखर पगार, विकास खेडकर, शुभम भदाणे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जलसमाधी आंदोलनात संजय शिवदे, बापू कोळी, सतिश भोई, अर्जुन जावळे, सोनू मोरे, दीपक भोई, विष्णू सोनवणे, संजय भोई, शिवाजी नाईक, संदीप भोई आदींसह शंभरहून अधिक मच्छिमार पुरुष व महिला लेकराबाळांसह  सहभागी झाल्या.


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...