Agriculture news in Marathi, 'prahar' organization to attack Raj Bhavan today | Agrowon

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘प्रहार’चा आज राजभवनाला घेराव 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. १४) मुंबई येथे राजभवनावर आंदोलन करण्यात येणार आहे. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता राजभवन, मलबार हिल या ठिकाणी संघटनेकडून आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. १४) मुंबई येथे राजभवनावर आंदोलन करण्यात येणार आहे. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता राजभवन, मलबार हिल या ठिकाणी संघटनेकडून आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सरकार स्थापन होण्याचा कोणताही मार्ग अजूनही दिसत नसल्याने राज्यपाल यांनी सद्यःस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसात वाहून गेलेला आहे. 

राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना शासनातर्फे त्वरित मदत मिळावी व पीकविम्याची रक्कम ताबडतोब मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा हा राजभवनावर धडकणार आहे. 

राज्यातील सर्व शेतकरी बांधव व शेतमजुरांनी या मोर्च्यात सहभागी होऊन आपला बुलंद आवाज शासनापर्यंत पोचवण्यासाठी जास्तीत- जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...