agriculture news in marathi, prakash ambedkar speaks about election agenda,pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाडा दुष्काळमुक्त करणे हाच आमचा निवडणुकीचा मुद्दा : अॅड. प्रकाश आंबेडकर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

आम्ही २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असून, मी स्वतः निवडणूक लढणार नाही. ‘एमआयएम’बरोबरच्या चर्चेसाठी आमचे दरवाजे बंद झालेले नाहीत; तर एमआयएमनेच दरवाजांना कुलूप लावले असून, चावीदेखील त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यावयाचा आहे. विविध राष्‍ट्रपुरुषांची स्मारके महत्त्वाची असली तरी, आम्ही नागरिकांच्या प्रश्‍नांवर निवडणूक लढवीत आहोत.

- ॲड. प्रकाश आंबेडकर.

पुणे  ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून, उच्च मागणीच्या काळातदेखील २.५ टक्के वीज शिल्लक होती. यामुळे आता पाण्यावरील वीजनिर्मिती बंद करून, ते पाणी बोगद्यांद्वारे देऊन मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याची आमची योजना आहे. या योजनेमुळे भविष्यात पाण्यासाठी एकही नागरिक वंचित राहणार नसल्याचा आम्हाला विश्‍वास आहे. हाच आमचा निवडणुकीचा मुद्दा असणार असून, नागरिकांनी याचा विचार करून आम्हाला सत्ता द्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

पुण्यात सोमवारी (ता.२३) आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात कोयना आणि टाटाच्या पुणे जिल्‍ह्यातील पाच धरणांमधील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. मात्र आता विविध पद्धतींमुळे आणि अपारंपरिक ऊर्जेमुळे भारत स्वयंपूर्ण झाला आहे. सरकारच्या अहवालानुसार उच्च मागणीच्या काळात मुबलक वीजपुरवठा करूनदेखील २.५ टक्के वीज शिल्लक राहिली होती. यामुळे आता पाण्यावर उत्पादित होणारी वीजनिर्मिती बंद करून हे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी बोगद्याद्वारे देण्याची आमची योजना आहे. यासाठी कोयना आणि टाटाच्या धरणांमधून वीजनिर्मिती झाल्यानंतर ८० टीएमसी पाणी नद्यांद्वारे समुद्राला मिळते. हे पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी बोगद्यांद्वारे कृष्णा नदीच्या पात्रातून गोदावरी आणि उत्तर महाराष्ट्रातील नद्यांमध्ये आणले जाईल. हे शाश्‍वत पाणी कोरडवाहू भागाला मिळाल्यास भविष्यात एकही नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही. ही योजनाच आमच्या निवडणुकीचा मुद्दा असणार आहे. ही योजना साकारायचे धाडस यापूर्वीच्या सरकारमध्ये नव्हते ते धाडस आम्ही दाखवित आहोत. 
 


इतर ताज्या घडामोडी
अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी...
जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मितीकंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...