Agriculture news in marathi Pratap Saranaik's letter to Thackeray; Request to align with Modi | Agrowon

प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र;  मोदींशी जुळवून घेण्याची विनंती

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी जुळवून घेण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. 

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारमधील मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा शिवसेनेच्या मागे लावत आहेत, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी जुळवून घेण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. 

पत्रात म्हटले आहे, ‘‘सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करीत असतील, तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे.

एका केसमधून जामीन मिळाला, की तत्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो, की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे, अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. मोदींसोबत जाण्याच्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.’’ दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे, की सरनाईक यांच्या पत्राचा शिवसेना सकारात्मक विचार करणार असेल, तर आमचे पक्षश्रेष्ठीही योग्य विचार करतील.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...