बियाणे खरेदी करण्यापूर्वी उपलब्धतेबाबत पूर्व चौकशी करावी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रब्बी बियाणांना या हंगामात शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने विद्यापीठातील रब्बीचे बियाणे संपलेले आहे. त्यामुळे येण्यापूर्वी चौकशी करून मगच विद्यापीठात किंवा विक्री केंद्रात यावे.
बियाणे खरेदी करण्यापूर्वी उपलब्धतेबाबत पूर्व चौकशी करावी  Pre-availability inquiries should be made before purchasing seeds
बियाणे खरेदी करण्यापूर्वी उपलब्धतेबाबत पूर्व चौकशी करावी Pre-availability inquiries should be made before purchasing seeds

नाशिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रब्बी बियाणांना या हंगामात शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने विद्यापीठातील रब्बीचे बियाणे संपलेले आहे. त्यामुळे येण्यापूर्वी चौकशी करून मगच विद्यापीठात किंवा विक्री केंद्रात यावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.      प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार,विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांतील २७ विक्री केंद्रामध्ये विद्यापीठ उत्पादित बियाणे उपलब्ध करून देत असते. या रब्बी हंगामामध्ये विद्यापीठाच्या बियाण्यांना शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्वारीच्या विविध वाणांचे १७४.६८ क्विंटल बियाणे, हरभऱ्याच्या विविध वाणांचे १६३५.८० क्विंटल बियाणे, गव्हाच्या ''फुले समाधान'' या वाणाचे ११४९.६०  क्विंटल बियाणे आणि करडईचे १२.८० क्विंटल बियाण्यांची शेतकऱ्यांना विक्री करण्यात आलेली आहे.  या रब्बी हंगामाच्या बियाण्यांच्या विक्रीतून विद्यापीठाला १ कोटी ७७ लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याचे नमूद करण्यात आलेले  आहे.

येथे करा येण्यापूर्वी चौकशी 

शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे पाहिजे असल्यास बियाणांच्या उपलब्धतेबाबत विक्री केंद्राच्या ०२४२६-२४३३४५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करूनच यावे, असे कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com