agriculture news in marathi pre-cooling and packing technique for fruits and vegetables | Page 2 ||| Agrowon

फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग तंत्र

राजेंद्र वारे
सोमवार, 23 मार्च 2020

फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची विक्री होणे आवश्‍यक आहे. हंगामामध्ये बाजारपेठेत एकाच वेळी अधिक आवक झाल्यामुळे दर घसरतात. शेतकऱ्यांना कमी दरामध्ये विक्री करावी लागते किंवा त्यांची नुकसान होते. अशा नाशवंत फळे आणि पालेभाज्यांवर प्रक्रिया करून त्यांचा साठवण कालावधी वाढवणे शक्य आहे. त्याची स्थानिक बाजारात विक्री किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात करणे शक्य होते.

फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योग करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची विक्री होणे आवश्‍यक आहे. हंगामामध्ये बाजारपेठेत एकाच वेळी अधिक आवक झाल्यामुळे दर घसरतात. शेतकऱ्यांना कमी दरामध्ये विक्री करावी लागते किंवा त्यांची नुकसान होते. अशा नाशवंत फळे आणि पालेभाज्यांवर प्रक्रिया करून त्यांचा साठवण कालावधी वाढवणे शक्य आहे. त्याची स्थानिक बाजारात विक्री किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात करणे शक्य होते.

फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योग करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

 • फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योगाची जागा महत्त्वाची भूमिका बजावते. कारण त्यासाठी आवश्यक कच्चा माल हा उद्योगाच्या परिसरातून उपलब्ध होतो. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाची जागा योग्य असणे आवश्‍यक आहे. उद्योग स्थानापासून सुमारे ७५ कि.मी. पट्ट्यातील होणाऱ्या पिकांची लागवड, काढणीचा हंगाम यांची मागील किमान ३ वर्षांपर्यंतची सखोल माहिती करून घ्यावी. याला इंग्रजीमध्ये ‘कॅचमेंट एरिया स्टडी’ असे म्हणतात.
   
 • या माहितीवरून उद्योजकाला ऋतुमानानुसार किती कच्चा माल उपलब्ध होऊ शकेल? याचा अंदाज येतो. ऋतुमानानुसार, प्रक्रिया करता येणारी उत्पादने व त्यासाठी योग्य प्रक्रिया तंत्राची निवड करता येते. आपल्या प्रक्रिया उद्योगाची शेतीमाल हाताळणी आणि एकूण क्षमता ठरवता येते.
   
 • एकूण आवश्यक क्षमतेचा अंदाज आल्यानंतर त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, कच्चा माल खरेदी करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी खेळते भांडवलाचा अंदाज घ्यावा लागतो. भांडवलाच्या उभारणीचे नियोजन करता येते.
   
 • तयार होणाऱ्या उत्पादनाच्या विक्रीसाठी उद्योगापासून नजीकची बाजारपेठ, दूरच्या किंवा परदेशी बाजारपेठ यांची माहिती घ्यावी. वाहतुकीसह निर्यातीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन केले पाहिजे. नियोजन करताना कच्चा माल, विक्रीयोग्य उत्पादन यांच्या बाजारपेठेतील एकूण उलाढालीचे सर्वेक्षण करावे. पूर्ण सर्वेक्षण शक्य नसल्यास काही अस्ताव्यस्त नमुने घेऊन केलेले सर्वेक्षण आणि विश्लेषण पुढील निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

प्रक्रिया उद्योगाची कार्यपद्धती

 • फळे व भाज्या काढणीनंतर हा कच्चा माल निवडल्यानंतर वातानुकूलित वाहनातून प्रक्रिया केंद्रात आणला जातो. बाजारातील मागणीप्रमाणे मालाची प्रतवारी व वर्गवारी केली जाते.
 • हा शेतीमाल प्रीकूलिंग चेंबरमध्ये १ अंश सेल्सिअस तापमानात ठेवला जातो. या प्रक्रियेस साधारणपणे ४ ते ६ तासांचा वेळ लागतो. प्रीकूलिंग तंत्र द्राक्ष, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, सफरचंज, मोसंबी, संत्री, लिंबू, अंजीर, पपई, पेरू, डाळिंब यांसारख्या फळांना आणि बेबी कॉर्न, श्रावणी घेवडा, घेडवडा, शेवगा, कारले पडवळ, ढेमसे, गवार, चवळी, दोडका, तोंडली, फ्लॉवर, कोबी, गाजर, भोपळा, ढोबळी मिरची, भेंडी, फरसबी, काकडी, लिंबू, मिरची, अळिंबी, वांगी अशा अनेक भाज्यांसाठीही वापरले जाते.
 • कच्चा माल पाण्यातून धुवून घेते वेळी पाण्याचे तापमान किमान ५ अंश सेल्सिअस ठेवले जाते. निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन (सोडिअम हायपोक्लोराईड) ५० ते १०० पीपीएम च्या द्रावण वापरले जाते.
 • प्रीकूलिंग प्रक्रियेनंतर बाजारपेठेसाठी आवश्यक गुणवत्ता लक्षात घेऊन प्रतवारी किंवा वर्गवारी केली जाते. हा माल पॅक हाउसमध्ये २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ६५ ते ७५ टक्के सापेक्ष आर्द्रता अशा नियंत्रित वातावरणामध्ये ही प्रक्रिया केली जाते.
 • यानंतर ताज्या स्वरुपातील विक्रीसाठी मागणीनुसार आवश्यक तितका शेतीमाल पाठवला जातो. तयार माल आवश्यकतेनुसार योग्य आकारात पॅक करून शीतगृहामध्ये (तापमान १ अंश सेल्सिअस व सापेक्ष आर्द्रता ९८ टक्के) साठविला जातो. यासाठी वातावरण नियंत्रित शीतगृहाची आवश्यकता असते.
 • उर्वरित शेतीमाल अधिक काळ साठवण्यासाठी वाळवणे आवश्यक असते. त्यातील पाणी उष्ण हवेच्या प्रवाहाद्वारे काढून घेतले जाते.

प्रीकूलिंग आणि पॅकिंग हाऊस प्रक्रिया 

कच्चा माल (वातानुकूलित वाहनातून वाहतूक)

प्रीकूलिंग चेम्बर (उत्पादनाचे तापमान १ अंश सेल्सिअस येईपर्यंत)

प्रतवारी व वर्गवारी (पॅक हाउसचे तापमान २३ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष
आर्द्रता ६५ ते ७५ टक्के)

पाण्याद्वारे धुणे (पाण्याचे तापमान साधारण ५ अंश सेल्सिअस व पाण्यात ५० ते १०० पीपीएम क्लोरीन मिसळणे)

वाळविणे

गरजेनुसार योग्य आकारात पॅक करणे

शीतगृह साठवण (शीतगृहातील तापमान १ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ९८ टक्के)

बाजारपेठेतील मागणीनुसार, वातानुकूलित वाहनातून पाठविणे (वाहनातील तापमान १ अंश सेल्सिअस)
 

संपर्क -राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांवरील तज्ञ आहे.)


इतर कृषी प्रक्रिया
भाजीपाला, फळे प्रक्रियेसाठी अत्याधुनिक...भाजीपाला व फळे प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे....
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बाअननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात...
मोसंबी, आवळा वाढवितात रोग प्रतिकारशक्ती सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार...
संरक्षक पदार्थांचा प्रमाणबद्ध वापर...संरक्षक पदार्थ म्हणजे असे घटक जे पदार्थामध्ये...
आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थआंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे...
फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग...फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची...
काढणीपश्चात टिकवण क्षमतेवर परिणाम...भाजीपाला पिकांमध्ये अधिक काळ साठविण्यावर अनेक...
पदार्थाच्या मूल्यवर्धनासाठी गुलकंदाचा...गुलाब हे फूल म्हणून प्रसिद्ध आहेच त्याच बरोबरीने...
साठवणीतील धान्यावरील प्राथमिक किडीजगभरामध्ये किडीमुळे अन्नधान्याचे प्रति वर्ष...
वाढवा मटकीची पौष्टिकतामटकीचे बियाणे क्षारांमध्ये (मीठ)भिजवल्याने...
शेंगदाण्यापासून विविध पदार्थांची...पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासून बनविलेल्या...
औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थकवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या...
केक विक्रीतून मिळतील रोजगाराच्या संधीबेकरी पदार्थांत केक या पदार्थाला अनन्यसाधारण...
कसावापासून स्नॅक्‍सनिर्मितीअन्न सुरक्षेच्या दृष्टीने कसावा महत्त्वाचे पीक...
सोयापदार्थांची निर्मिती फायदेशीरसोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता...
ताडगूळ निर्मिती प्रक्रियाताड, माड, पाम आणि खजुरीच्या झाडांपासून मिळणारा...
जास्त प्रमाणात पदार्थ सुकविण्यासाठी...टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये गरम हवेचा वापर करून...
अशी ओळखा अन्नातील भेसळ..अन्नपदार्थातील भेसळीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप...
फळबाग अन् प्रक्रिया उद्योगांवर भरजर्मनीमधील शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने दूध, मांस,...