agriculture news in marathi Pre-cooling of fruits and vegetables | Page 3 ||| Agrowon

फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरण

स्नेहा सरवदे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. 

पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. पूर्व-शीतकरण उत्पादनांच्या श्वसनाचा दर कमी करते आणि त्याचे साठवण आयुष्य वाढवते.

ताजी, दर्जेदार फळे आणि भाज्या यांचा ग्राहकाला पुरवठा करण्यासाठी काढणीनंतरचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. काढणीनंतर पूर्व-शीतकरण (प्री-कुलिंग) ही महत्वाची प्रक्रिया आहे.  काढणी केलेल्या पिकांचे तापमान आणि थंड साठवण यात बराच फरक आहे. त्यामुळे पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. पूर्व-शीतकरण उत्पादनांच्या श्वसनाचा दर कमी करते आणि त्याचे साठवण आयुष्य वाढवते. 

 • फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे त्या काढणीनंतर ताबडतोब ग्राहकापर्यंत पोहचवणे आवश्यक असते,अन्यथा त्या खराब होण्यास सुरुवात होते. परंतु प्रत्यक्षरित्या फळे व भाज्या ताबडतोब ग्राहकापर्यंत पोहचवणे शक्य नसते. म्हणून उत्पादनाची साठवण क्षमता अधिक असणे आवश्यक आहे. 
 • फळे, भाज्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी, कापणीपश्चात शक्य तितक्या लवकर प्री-कुलिंगची प्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते. काढणीनंतर पिकातील उष्णता शक्य तितक्या वेगाने काढून टाकली पाहिजे, कारण बहुतेक उत्पादनासाठी सुमारे ३५ अंश सेल्सिअस तापमानाच्या परिस्थितीत एका तासाच्या विलंबामुळे जवळपास एका दिवसाच्या साठवण कालावधीचे नुकसान होते. 

पूर्व-शीतकरणाची गरज 

 • भारतीय फलोत्पादन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार विशेषतः द्राक्षे, बेरी, खरबूज, चिकू, भेंडी, टोमॅटो, शिमला मिरची, वांगे, काकडी, मटार, पालक, आंबा,पपई,पेरू, कच्ची केळी, डाळिंब, मुळा, कोबी, फ्लॉवर, गाजर या उत्पादनांचे पूर्व-शीतकरण  करावे.
 • पूर्व-शीतकरण पद्धतीची निवड प्रामुख्याने प्रत्येक पीक प्रकारच्या आवश्यकतेनुसार करावी. आर्थिक स्थिती, आवश्यक कामगार, उपलब्ध उपकरणे, आणि साहित्यावर ही प्रक्रिया अवलंबून असते.

पूर्व शीतकरणाच्या पद्धती 
रूम कुलिंग 

 • ही एक अत्यंत साधी व सोपी पद्धत आहे, ज्यामध्ये फळे व भाज्या रेफ्रिजरेटेड खोलीत किंवा कंटेनरमध्ये ठेवली जातात. 
 • इतर पद्धतींच्या तुलनेने यास कमी ऊर्जा लागते. तसेच उष्णता काढून टाकण्याचा दर (प्री-कुलिंग) कमी असल्यामुळे,कमी नाशवंत असणाऱ्या फळे व भाज्यांसाठी याची शिफारस केली आहे.

फोर्सड् एअर कुलिंग 
स्टोरेज चेंबरमध्ये थंड हवेचा वेगाने प्रसार करून उष्णता (फील्ड हीट) काढून टाकली जाते. 

हायड्रो कुलिंग 
ही एक अत्यंत प्रभावी पूर्व शीतकरण पद्धत आहे. या पद्धतीमध्ये फळे व भाज्यांवर थंड पाण्याने फवारणी केली जाते किंवा ती थंड पाण्यात बुडवली जातात. याचा फायदा म्हणजे पाण्याच्या वापरामुळे फळे व भाज्या स्वच्छ होतात. 

व्हॅक्यूम कुलिंग 
या पद्धतीत फळे व भाज्या एका एअर टाईट चेंबरमध्ये ठेवतात. अशा प्रकारे हवेचा दबाव कमी होतो. पिकांच्या ओलाव्याचे काही प्रमाणात बाष्पीभवन होते. पाण्याचे बाष्पीभवन करण्यासाठी जास्त प्रमाणात उष्णता आवश्यक असल्याने ही पद्धत पूर्व शीतकरणाचा सर्वात जलद मार्ग आहे. पालेभाज्यांसाठी ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे.  

आइस कुलिंग 

 • या पद्धतीत स्टोरेज कंटेनर किंवा बॉक्समध्ये बर्फ घालून ठेवला जातो. बर्फ वितळत असताना, थंड पाण्यामुळे उत्पादनाची उष्णता कमी होते. 
 • ही पद्धत प्रामुख्याने उत्पादन वाहतुकीदरम्यान वापरली जाते. 

पूर्व शीतकरणाचे फायदे 

 • इष्टतम साठवण तापमान लवकर होत असल्यामुळे शीतगृहात साठवण करणे सोपे जाते.  
 • उत्पादनाची श्वसन क्रिया मर्यादित केली जाते.  त्याद्वारे उत्पादनाच्या वजनाचे संरक्षण होते. उत्पादनाची गुणवत्ता टिकवली जाते. 
 • सूक्ष्म जंतूच्या वाढीस प्रतिबंध करता येतो. 
 • कमी वेळेत होणारी प्रक्रिया उत्पादकास मूल्यवर्धन मिळवून देण्यास उपयुक्त ठरते.    

संपर्क : स्नेहा सरवदे,९४२३३४४७७२, (अन्न आणि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)


इतर कृषी प्रक्रिया
होळीसाठी नैसर्गिक रंगनिर्मितीचा व्यवसायघरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे....
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायएव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक...
अंजिरापासून बर्फी, गर, पावडरअंजिरामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व-क व...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थचिंच फळांवर प्रक्रिया करून वेगवेगळे...
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
जवस : एक सुपर फूडजवस  पिकाचा प्रत्येक भाग हा...
आरोग्यदायी गुलकंदगुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला...
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थअंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते....
प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य...भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
करार शेती यशस्वी होण्यासाठी पारदर्शकता...बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
आहार अन्‌ प्रक्रिया उद्योगासाठी...भरड धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने स्वस्त असतात....
काशीफळापासून रायता, सूप, हलवाकाशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ...
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...