agriculture news in marathi, pre monsoon cotton crop area decrease, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाण्यात प्री-मॉन्सून कापूस लागवड घटली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

गेल्या हंगामात कपाशीवर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता या वेळी २० मेपर्यंत बियाणे पुरवठा न झाल्याने तसेच कृषी विभागाने प्री-मॉन्सून कापूस लागवड न करण्याचे आवाहन केल्याने यंदा ही लागवड झालेली नाही. दरवर्षी तालुक्‍यात तीनशे ते चारशे हेक्‍टरवर प्री-मॉन्सून कपाशी लागवड व्हायची.
- श्री. अंगाईत, तालुका कृषी अधिकारी नांदुरा, जि. बुलडाणा.

बुलडाणा ः मागील हंगामात बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही शेतकऱ्यांना बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून पीक वाचवता आले नाही. यामुळे आगामी हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाने कापूस लागवड २० मे आधी न करण्याचे केलेले आवाहन तसेच या तारखेपर्यंत बियाणे विक्रीला पायबंद घातल्याने प्री-मॉन्सून कापूस लागवडीचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाले आहे. प्रखर उष्णता व सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी देखील मे महिन्यात कपाशी लागवडीसाठी पुढाकार घेणे टाळले होते.

दरवर्षी जिल्ह्यात मे महिन्यात प्री-मॉन्सून कपाशी लागवडीचे काम सुरू होते. या लागवडीमुळे उत्पादनात मोठी वाढ करता येते असा शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे अनुभव होता. त्यामुळेच जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्‍यांमध्ये सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर प्री-मॉन्सून कपाशी लागवड व्हायची.

यावर्षी उष्णतामान सातत्याने ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहल्याने, तसेच जलस्रोतांमधील पाणीपातळी खालावल्याने अनेकांनी या लागवडीकडे पाठ फिरवली. गेल्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड केलेल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक झाला होता. त्यामुळे अनेकांना नफा होणे तर दूरच मात्र केलेला खर्चही निघालेला नव्हता. त्यातच कृषी खात्याने २० मेपर्यंत बाजारपेठेत बियाणे उपलब्ध करून देण्यास कंपन्यांना मज्जाव केला. शिवाय प्री-मॉन्सून कापूस लागवड टाळण्याचे आवाहन केले. ज्यांनी कपाशीची लागवड केली त्यांना हे पीक उष्णतेपासून वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

प्री-मॉन्सून बीटी कपाशी लागवड ही काही कंपन्यांसाठी मोठी संधी असे. हंगामाच्या सुरवातीलाच बियाणे विक्री व्हायची. शिवाय हे प्री-मॉन्सून कपाशीचे प्लॉट नंतर वाणाचे ब्रॅंडिंग करण्यासाठी फायदेशीर ठरत होते. दिवाळीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या क्षेत्र भेटीचे कार्यक्रम घेतले जात. यावर्षी लागवड अत्यंत कमी असल्याने बियाणे विक्रीला फटका बसला आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...