Agriculture news in marathi Pre-monsoon cotton cultivation started in Aurangabad district | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात प्रस्तावित कपाशी लागवड क्षेत्रापैकी मॉन्सूनच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात प्रस्तावित कपाशी लागवड क्षेत्रापैकी मॉन्सूनच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३२ हजार हेक्टर आहे. गतवर्षी खरीप हंगामात ६ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामुळे कृषी विभागाकडून येत्या खरीप हंगामासाठी ७ लाख १६ हजार हेक्टर पेरणी प्रस्तावित करण्यात आली. त्यात ४ लाख ५ हजार हेक्‍टरवर कपाशी, १ लाख ८२ हजार हेक्‍टरवर मका, ४५ हजार हेक्‍टरवर तूर, ३१ हजार हेक्‍टरवर बाजरीचा समावेश आहे. 

यंदा कडधान्याचे क्षेत्र ६४ हजार हेक्‍टर प्रस्तावित आहे. त्यास अनुसरून शेतकऱ्यांनी बियाणे व खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली. पैठण, सोयगाव, सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी कपाशीच्या मान्सूनपूर्व लागवडीसह आले लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्यात कपाशीच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रासाठी २० लाख कपाशी बियाणे पाकिटांची आवश्यकता नोंदविली गेली होती. त्या तुलनेत १७ लाख ८६ हजार कपाशी बियाणे पाकिटे उपलब्ध आहेत. मक्याच्या पेरणी खालील क्षेत्रासाठी २७ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता होती. त्या तुलनेत २६ हजार ८३३ क्विंटल मका बियाणे पुरविले आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. 

७० हजार ८८७ टन खते उपलब्ध 

औरंगाबाद जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख १ हजार ७६९ मेट्रिक टन इतका आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ३३ हजार ९१० मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर आहे. शिवाय ६६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा रब्बी हंगामानंतर जिल्ह्यात शिल्लक होता. मंजूर खत आवंटनाच्या तुलनेत ७० हजार ८८७ मेट्रिक टन रासायनिक खत एप्रिलपासून १ मे पर्यंत जिल्ह्यात उपलब्ध केले आहे, अशी माहिती गंजेवार यांनी दिली. उपलब्ध खतांपैकी ७३ हजार ७५४ मेट्रिक टन रासायनिक खतांची विक्री झाली. एक मे अखेर जिल्ह्यात ४७३५ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध होते, असेही गंजेवार यांनी स्पष्ट केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...