agriculture news in Marathi, pre monsoon cotton sowing start in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी संकेतानुसार पूर्वहंगामी कापूस लागवड १६ मे रोजीच केली आहे. १६ ते १८ मेदरम्यान लागवड केलेल्या कापूस पिकात जोमदार बीजांकुरण झाले आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, गुजरातमधून बियाणे आणून शेतकऱ्यांनी ही लागवड उरकून घेतली आहे. 

जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी संकेतानुसार पूर्वहंगामी कापूस लागवड १६ मे रोजीच केली आहे. १६ ते १८ मेदरम्यान लागवड केलेल्या कापूस पिकात जोमदार बीजांकुरण झाले आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, गुजरातमधून बियाणे आणून शेतकऱ्यांनी ही लागवड उरकून घेतली आहे. 

राज्यात कापूस बियाणे वितरणासंबंधी शासकीय यंत्रणांनी गोंधळाची स्थिती निर्माण केली. सुरवातीला १ जूनपासून कापूस बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना सुरू होईल, असा आदेश जारी केला होता. नंतर २५ मेपासून बियाणे विक्री करू. काळाबाजार रोखायचा आहे, गुलाबी बोंड अळी नष्ट करायची आहे, असे शासनाने म्हटले. 

परंतु शेतकऱ्यांनी बियाणे वितरणासंबंधीचा विलंब लक्षात घेता मध्य प्रदेश व गुजरातमधून कापसाचे बियाणे आणले. तेथून शेतकऱ्यांनी हे बियाणे १००० ते ११०० रुपये प्रतिपाकीट या दरात आणले. काही शेतकऱ्यांनी देशी संकरित बियाणे आणले आहे. नियमानुसार तेथील विक्रेत्यांनी बिले व इतर सविस्तर मुद्दे नमूद करून शेतकऱ्यांना हे बियाणे दिले आहे. शेतकऱ्यांनी लागवड १६ मे पासून सुरू केली. लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर व यावलमधील तापी नदीकाठी, जळगाव, पाचोरा भागात गिरणा नदीकाठी आणि धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत वेगात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

शिंदखेडा, शिरपुरातील काही शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशात कार्यरत कंपन्याकडून देशी कापूस बियाण्याची लागवड सुरू केली आहे. या शेतकऱ्यांना संबंधित कंपनी जादा दर कापूस खरेदीच्या वेळेस देणार आहे. 

यामुळे केली लवकर लागवड
खानदेशात १५ मे नंतर कापूस लागवडीचा प्रघात आहे. वेचणी पोळा सणाला व्हायलाच हवी, असे नियोजन शेतकरी करतात. मग लागलीच डिसेंबरमध्ये कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्या क्षेत्रात मका किंवा इतर रब्बी पिके, वेलवर्गीय पिकांची लागवड करतात. पूर्वहंगामी लागवड जूनमध्ये केली तर वेचणी लांबते. मग पुढे रब्बीचे नियोजन चुकते, असे १८ मे रोजी कापसाची लागवड करणारे जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...