Agriculture news in marathi Pre-monsoon everywhere in Vidarbha Heavy presence of rain | Agrowon

विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने सामान्यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यासोबतच कापूसपट्टयात पूर्वहंगामी लागवडीला देखील सुरुवात झाली आहे.

नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने सामान्यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यासोबतच कापूसपट्टयात पूर्वहंगामी लागवडीला देखील सुरुवात झाली आहे. परंत, सरासरी १०० मिली पाऊस झाल्यानंतर साधारणतः बुधवार (ता.१०) नंतर पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

यवतमाळ जिल्हयात सर्वाधिक पावणेपाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. यावर्षी २६ मे पासून कृषी विभागाने बियाण्याची उपलब्धता यवतमाळसह राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये केली होती. गुलाबी बोंडअळीचा भविष्यातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली. सद्यस्थितीत पूर्व आणि पश्‍चीम विदर्भातील सर्वच जिल्हयात पावसाने हजेरी लावली आहे. 

गोंदिया जिल्हयात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली. नागपूरात दोन दिवस पावसाची उघडझाप सुरु आहे. बुधवारी (ता.३) देखील अनेक जिल्हयांमधे पावसाने हजेरी लावली. नागपूर विभागातील सहा जिल्हयात पेरणीला सुरुवात झाली नसली तरी यवतमाळसह अकोला जिल्हयात शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरूवात केली आहे. यवतमाळ जिल्हयात हळद लागवडीला देखील वेग आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 


इतर बातम्या
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...