पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार 

मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते कर्नाटकची किनारपट्टी, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते कर्नाटकची किनारपट्टी, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाच्या सरी बरसत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पावसाचा प्रभाव काहीसा कमी होणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या भूपृष्टावर येतात. राज्यात ढगाळ वातावरण तर काही वेळा कडक ऊन अशी स्थिती होत असल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. रविवारी (ता. ८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होत किमान तापमानात घट होत आहे.  अरबी समुद्राच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच तमिळनाडू आणि परिसर केरळ, कोमोरिन परिसरांत चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशचा परिसर ते हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, झारखंड, दक्षिण बिहार परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात वातावरणात बदल होत आहे.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  सोमवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  मंगळवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  गुरुवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया  रविवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.२ 
  • अलिबाग ३३ 
  • रत्नागिरी ३४.५ 
  • डहाणू ३४.९ 
  • पुणे ३८.२ 
  • जळगाव ४२ 
  • कोल्हापूर ३४.६ 
  • महाबळेश्‍वर ३०.१ 
  • मालेगाव ४१.२ 
  • नाशिक ३८.९ 
  • सांगली ३७ 
  • सातारा ३६.१ 
  • सोलापूर ३९.४ 
  • औरंगाबाद ३९.७ 
  • परभणी ३८.५ 
  • नांदेड ४० 
  • अकोला ४२.२ 
  • अमरावती ४०.४ 
  • बुलडाणा ३९.६ 
  • ब्रह्मपुरी ४०.४ 
  • गोंदिया ३८.४ 
  • नागपूर ३९.१ 
  • वर्धा ४०.५ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com