agriculture news in marathi Pre-monsoon in Khandesh Rain showers | Page 2 ||| Agrowon

खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

जळगाव ः खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा गेले तीन दिवस अनेक भागात धुमाकूळ सुरू आहे. यामुळे कांदा, मका, बाजरी या पिकांची हानी झाली आहे.

जळगाव ः खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा गेले तीन दिवस अनेक भागात धुमाकूळ सुरू आहे. यामुळे कांदा, मका, बाजरी या पिकांची हानी झाली आहे. शिवाय सततच्या ढगाळ वातावरणामुळे केळी पिकाची काढणीदेखील वेगात करून घ्यावी लागत आहे. 

या आठवड्यात सोमवारपासून (ता.३) जळगाव, धुळे व नंदुरबारात पाऊस झाला आहे. यात धुळ्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नवापूर, जळगावमधील रावेर, जामनेर आदी भागात पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान झाले. सततच्या ढगाळ वातावरणासह सुसाट वाऱ्यामुळे केळी पिकात काढणीवर आलेल्या केळी झाडांची पडझड वाढली आहे. यामुळे नुकसान होत आहे. 

सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केळी पिकाची काढणी सुरू आहे. पण वातावरण ढगाळ, सुसाट वाऱ्यांचे असल्याने शेतकरी केळीची काढणी मिळतील, त्या दरात करून घेत आहेत. त्यात लॉकडाऊनचाही फटका बसत आहे. 
पावसामुळे रावेर, मुक्ताईनगर, साक्री, शिरपूर भागात बाजरी, कांदा पिकांची हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान झाले असून, पंचनामे व तातडीने भरपाईची मागणी केली जात आहे. 

मक्याची काढणी सुरु

सध्या मका काढणी सुरू आहे. काही भागात मका पिकाची पक्व कणसे गोळा केली आहेत. या कणसांना पावसाच्या भीतीने झाकून ठेवावे लागत आहे. कारण, पावसात कणसे भिजल्यास मळणीत अडचणी येतील. पावसाच्या भीतीने कापूस, पपई, गहू आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मशागतीचे काम शेतकरी करून घेत आहेत. ट्रॅक्टरने नांगरणी सध्या सुरू आहे. शेतात गोळा केलेल्या कडब्याची कुट्टी करून ती घरात किंवा गोठ्यात साठवून घेतली जात आहे.


इतर बातम्या
औरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट...औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...