agriculture news in Marathi, pre-monsoon possibility in Kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

पुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंत हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. आज (ता. १५) कोकणात काही ठिकाणी सरींवर सरी बरसणार असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपुरात उष्ण लाट होती. चंद्रपूर येथे राज्यातील उंच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   

पुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंत हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. आज (ता. १५) कोकणात काही ठिकाणी सरींवर सरी बरसणार असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपुरात उष्ण लाट होती. चंद्रपूर येथे राज्यातील उंच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   

वायू वादळामुळे कोकणात गुरुवारी पावसाने जोर धरला होता. शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तळा ९० मिलिमीटर, हर्णे ८०, श्रीवर्धन, मुरूड ७०, रोहा, मंडणगड ६०, म्हसळा आणि रत्नागिरी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी येत होत्या. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर पाऊस ओसरला होता.  बहुतांशी भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्यांना सुरवात झाली आहे. 

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान होत आहे. वाऱ्याचा वेगही वाढल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट आहे. तर उर्वरित राज्याचे तापमानाही कमी होऊ लागले आहे. विदर्भात आज (ता. १५) तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवसांत लाट ओसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.     
शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : 
कोकण : तळा ९०, हर्णे ८०, श्रीवर्धन, मुरूड प्रत्येकी ७०, रोहा, मंडणगड प्रत्येकी ६०, म्हसळा, रत्नागिरी प्रत्यकी ५०, राजापूर, दोडामार्ग, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी ४०, देवगड, सुधागडपाली, लांजा, मुलदे प्रत्येकी ३०, कनकवली, कुडाळ, मालवण, खालापूर, कुलाबा, वेंगर्ला, चिपळूण, अलिबाग, पोलादपूर, संगमेश्वर, माणगाव प्रत्येकी २०, सांताक्रूझ, सावंतवाडी, उल्हासनगर, वसई, भिरा, महाड, माथेरान, कल्याण, पेण, डहाणू, ठाणे प्रत्येकी १०.
मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ५०, लोणावळा ४०, महाबळेश्वर, चंदगड, पन्हाळा प्रत्येकी ३०, जावळी मेढा, राधानगरी प्रत्येकी २०, आजरा, वडगाव मावळ, शहूवाडी, भुदरगड, वेल्हे, गडहिंग्लज, कराड, शिरोळ, नाशिक प्रत्येकी १. 
घाटमाथा : आंबाणे ५०, लोणावळा ४०, ठाकूरवाडी, वाणगाव, डोंगरवाडी, खोपोली प्रत्येकी ३०, शिरगाव, शिरोटा, दावडी, कायेना, ताम्हिणी प्रत्येकी २०, भिवुपरी, भिरा प्रत्येकी १०. 

इतर अॅग्रो विशेष
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...