agriculture news in Marathi, pre monsoon rain in Nagar and Nashik district, Maharashtra | Agrowon

नगर, नाशिक जिल्ह्यांत पूर्वमोसमीची हजेरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 जून 2019

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. नाशिक अणि नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यातील कमाल तापमानातही वेगाने बदल होत असल्याचे दिसून आले आहे. रविवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कमी झालेल्या तापमानात सोमवारी (ता.३) सकाळपर्यंत मोठी वाढ झाली होती. 

विदर्भातील ब्रह्मपुरी व नागपूर येथे उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाट आली आहे. सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते.

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. नाशिक अणि नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यातील कमाल तापमानातही वेगाने बदल होत असल्याचे दिसून आले आहे. रविवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कमी झालेल्या तापमानात सोमवारी (ता.३) सकाळपर्यंत मोठी वाढ झाली होती. 

विदर्भातील ब्रह्मपुरी व नागपूर येथे उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाट आली आहे. सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते.

उन्हाचा चटका अधिकच वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, तर विदर्भातील सर्वच ठिकाणी उष्ण लाट आल्याचे दिसून आले. शुक्रवारपर्यंत (ता. ७) विदर्भात तीव्र लाटेचा, तर बुधवारपर्यंत (ता. ५) मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी दुपारनंतर नगर जिल्ह्यामधील राहुरी, पारनेर, कोपरगाव, नेवासा तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात सुपे, वाळवणे, हंगा, रांजणगाव मशिन परिसरात, राहुरी तालुक्यातील चिंचवडगाव, कोपरे वांजुळपोई, कोंढवड, सोनगाव, सात्रळ, पिंपरी अवघड, मांजरी भागात, नेवासा तालुक्यातील मांजरी, करजगाव परिसरात तर कोपरगाव तालुक्यातील काही गावांसह शहर परिसरात वादळी पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

सोमवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४ (४.१), जळगाव ४३.२ (१.६), कोल्हापूर ३६.० (२.५), महाबळेश्वर ३३.२ (६.०), मालेगाव ४२.६ (३.८), नाशिक ३८.२ (१.७), सांगली ३८.६ (४.१), सातारा ३९.९ (५.८), सोलापूर ४३.३ (४.७), अलिबाग ३६.२ (३.४), डहाणू ३५.१ (१.१), सांताक्रूझ ३४.५ (१.१), रत्नागिरी ३३.७ (१.३), औरंगाबाद ४३.० (४.९), बीड ४४.४ (५.६), परभणी ४५.६ (५.१), अकोला ४५.९ (४.८), अमरावती ४५.४ (४.५), बुलडाणा ४२.३ (४.९), बह्मपुरी ४७.० (५.२), चंद्रपूर ४५.८ (३.३), गोंदिया ४३.० (०.८), नागपूर ४७.० (५.०), वाशीम ४३.०, वर्धा ४६.८ (५.२), यवतमाळ ४५.० (४.२).

राज्यात वादळी पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमीच्या सरी बरसण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी विदर्भात हजेरी लावल्यानंतर रविवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. आज. (ता. ४) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्यातील, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...