Agriculture news in marathi pre monsoon rains in 366 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ४२१ मंडळापैकी तब्बल ३६६ मंडळात सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. 

औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ४२१ मंडळापैकी तब्बल ३६६ मंडळात सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका अंतर्गत येत असलेल्या वालवड मंडळात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वैजापूर मंडळात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील वैजापूर, पाथरी, भूम, माजलगाव तालुक्यात सरासरी ३० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. तर, वाशी, परळी, वडवणी, आष्टी अंबड, गंगापूर, पैठण तालुक्यात सरासरी २० ते ३० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४२.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५० मंडळांत पूर्व मोसमी पाऊस झाला. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील नागमठाण मंडळात ६४ मिलिमीटर, खंडाळा ४५, महालगाव ४२, गंगापूर ५१, भेंडाला ४६, लोहगाव ३६, पिंपळगाव पी. ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांत, परभणी जिल्ह्यातही सर्व ३९ मंडळांत पाऊस झाला. त्यांपैकी पाथरी मंडळात ४५ मिलिमीटर, बाभळगाव ४५, तर हादगाव मंडळात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हिंगोली जिल्ह्यात ३० पैकी २४ मंडळांत १ ते २३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळांपैकी ५१ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ६२ मंडळांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील दिंद्रुड मंडळात सर्वाधिक ६० मिलिमीटर, त्यापाठोपाठ परळी मंडळात ४५, पिंपळगाव गाढे ३४, तालखेड ४१, गंगामसला ३५, धामणगाव ४०,आष्टी ३६, पाली मंडळात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

भूम, वाशी मंडळांत अधिक जोर 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी सर्व ५३ मंडळांत १ ते ३९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. हाडोळती मंडळात ३९ ,भादा ३४, औसा मंडळात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३८ मंडळांत पाऊस झाला. जिल्ह्यातील पाऊस झालेल्या मंडळांपैकी वाशी मंडळात ३४ ,भूम ४१, तर नळदुर्ग मंडळांत ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील भूम, वाशी तालुक्यातील सर्व मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...