लातूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा कहर सुरूच

निलंगा, जि. लातूर : निलंगा तालुक्यासह शिरूर अनंतपाळ, देवणी जळकोट तालुक्यात शुक्रवारी (ता. ७) पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागली. वादळासह आलेल्या पावसात काही ठिकाणी वीज पडली.
Pre-monsoon rains continue in Latur district
Pre-monsoon rains continue in Latur district

निलंगा, जि. लातूर : निलंगा तालुक्यासह शिरूर अनंतपाळ, देवणी जळकोट तालुक्यात शुक्रवारी (ता. ७) पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागली. वादळासह आलेल्या पावसात काही ठिकाणी वीज पडली. पूर्वमोसमी पावसाने शुक्रवारी कहरच केला. निलंगा तालुक्यातील पाच गावांत विज पडून आठ जनावरे दगावली. फळपिकांचे नुकसान झाले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून निलंगा तालुक्यात अधूनमधून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरीही वैतागला असून शेतातील मेहनत करणे अवघड झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी सरदारवाडी येथे बाबूराव तळभोगे यांच्या शेतात बांधलेले दोन हाणम जातीचे बैल व एक म्हैस वीज पडून दगावली. यामुळे दोन लाखापेक्षा अधिक नुकसान झाले.

तांबाळा येथील तुकाराम म्हेत्रे याचे एक बैल व एक गाय वीज पडून मृत झाले. ममदापूर येथील पांडुरंग बिराजदार यांची एक म्हैस वीज पडून मृत्युमुखी पडली. तर, ताडमुगळी येथील श्याम हिरामजी यांचा एक बैल वीज पडून दगावला. लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद, येरोळ, रोहिना परिसरातही जोरदार पाऊस झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातही नुकसान

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील डिग्गी, बेडगा परिसरात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात बेडगा येथे अंगावर वीज पडू दोन गाईंचा मृत्यू झाला. महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. डिग्गी, बेडगा, मानेगोपाळ, दगडधानोरा, मळगी, मळळीवाडी या सीमावर्ती भागात वादळी वाऱ्याने शेतातील झाडे उन्मळून पडली. तर, आंब्यांचे मोठे नुकसान झाले. मानेगोपाळ येथील ऋषिकेश माने यांच्या शेतातील आंब्यांचे नुकसान झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com