Agriculture news in marathi Pre-monsoon in Satara It continues to rain | Agrowon

साताऱ्यात पूर्वमोसमी  पाऊस सुरूच 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

कऱ्हाड व सातारा तालुक्‍यांत अनेक गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणी नुकसानही झाले. गारांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान सुरू आहे. 

सातारा : कऱ्हाड व सातारा तालुक्‍यांत अनेक गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणी नुकसानही झाले. गारांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान सुरू आहे. 

सातारा शहरासह काशीळ, नागठाणे परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कऱ्हाड शहर परिसरासह तालुक्‍यातील विविध भागात शनिवारी (ता.१)सायंकाळसह रविवारी (ता. २) दुपारीही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान झाले. सायंकाळी वाऱ्यासह पाऊस झाला. ओंड, उंडाळे, रेठरे बुद्रुक येथे तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या तडाख्याने नुकसान केले.

केसे, पाडळी व सुपने परिसराला मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याने झोडपले. काही वेळात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटातच पावसाला सुरुवात झाली. केसे येथील तांबी नावाच्या शिवारात गारांचा सडा पडला होता. गारांमुळे पिकांची दुरवस्था होऊन नुकसान झाले. सुपने, पाडळी परिसरात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. 

वीज पडल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू 

शिरवळ, जि. सातारा : कवठे (ता. खंडाळा) येथे रविवारी दुपारी वेताळमाळ परिसरात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शशिकांत दादासाहेब लिमण (वय ४२, रा. झगलवाडी) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय ६०, रा. कवठे) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. 

या बाबत माहिती अशी, की झगलवाडी येथून शशिकांत लिमण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेताळमाळ शेतात खाशाबा जाधव यांच्या शेतात उन्हाळी भुईमूग भिजविण्यासाठी रविवारी कवठे येथे गेले होते. या वेळी खाशाबा जाधव हे ही शेतात काम करत होते. दुपारी विजेचा कडकडाट सुरू असताना शेतात काम संपल्यावर बांधावर झाडाखाली हे दोघेजण जेवण करीत असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.

लिमण हे मुंबई येथे काम करीत होते. मात्र, सध्या लॉकडाउन असल्याने ते गावी आले होते. खाशाबा जाधव कवठे येथे पिठाची गिरणी चालवत होते. दरम्यान, शिरवळ पोलिस ठाण्याचे सागर अरगडे, पांडुरंग हजारे व विनोद पवार यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...