Agriculture news in Marathi, Pre-monsoon showers in 98 congregations in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ९८ मंडळांमध्ये पूर्वमोसमी पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

परभणी ः मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या सात जिल्ह्यांतील ९८ मंडळांमध्ये रविवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत वादळी वाऱ्यांमुळे फळपिकांचे नुकसान झाले.

औरंगाबांद जिल्ह्यातील उस्मानपुरा मंडळात (३० मिमी), काचंनवाडी, वैजापूर (१२), बालानगर (८), खंडाळा, लासूरगांव, पिंपळगाव या सात मंडळामध्ये पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील नेकनूर, अंबाजोगाई, बर्दापूर (१७), लोखंडी सावरगाव (६), ममदापूर (९), धारूर, परळी या आठ मंडळांमध्ये पाऊस झाला. 

परभणी ः मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या सात जिल्ह्यांतील ९८ मंडळांमध्ये रविवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत वादळी वाऱ्यांमुळे फळपिकांचे नुकसान झाले.

औरंगाबांद जिल्ह्यातील उस्मानपुरा मंडळात (३० मिमी), काचंनवाडी, वैजापूर (१२), बालानगर (८), खंडाळा, लासूरगांव, पिंपळगाव या सात मंडळामध्ये पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील नेकनूर, अंबाजोगाई, बर्दापूर (१७), लोखंडी सावरगाव (६), ममदापूर (९), धारूर, परळी या आठ मंडळांमध्ये पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ४५ मंडळांत पाऊस झाला. यामध्ये लातूर मंडळात (८), कासारखेडा (१८), गातेगाव (१८), तांदुळजा (७),  मुरुड (११), बाभळगाव (१४),  हरंगुळ (१२), चिंचोली (२१), औसा (८),  लामजणा (२६),  किल्लारी (१८), मातोळा (११), भादा (१५),  किनीथोट (११), बेलकुंड (१०),  रेणापूर (१०),  पोहरेगाव (११),  कारेपूर (५३),  पानगाव (१८), उदगीर (२०),  हेर (१२),  देवर्जन (२९),  वाढवणा (६), अहमदपूर (३२), किनगाव (६),  खंडाळी (२५),  शिरूरताजबंद (९),  हडोळती (१०),  अंधोरी (९), चाकूर (६),  वडवळ नागनाथ (८),  नळेगाव (८),  झरी बु. (१०),  शेळगाव (४९), निलंगा (३९), अंबुलगा (३७), पानचिंचोली (१३), देवणी (१४), वलांडी (१४), शिरूळ अनंतपाळ (९), साकोळी (२७).

उस्मानाबाद जिल्ह्यातील २२ मंडळांमध्ये पाऊस झाला. यामध्ये उस्मानाबाद शहर (१०), तेर (१९),  बेम्बाळी (१४), केशेगाव (१८), जळकोट (१५), उमरगा (१०), लोहरा (३२), माकणी (२२), जेवळी (२९) आदी मंडळांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सिंगणापूर मंडळात (१५), जांब (११), चाटोरी (९), गंगाखेड (१२),  राणीसावरगाव (१९) आदी मंडळांचा समावेश आहे.

हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी एका मंडळामध्ये पाऊस झाला. इटोली (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेत शिवारात शेतकऱ्यांनी दुष्काळात जिवापाड जपलेल्या केळी फळबागा मोडून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आसाराम घुगे, जगदीश घुगे, दत्तराव घुगे यांनी केली आहे.


इतर बातम्या
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
नाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरूनाशिक  : ''शिवभोजन योजना'' ही राज्यातील...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
कोल्हापूरला ३९१ कोटी रुपयांवर कर्जमाफी...कोल्हापूर : ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...