नाशिक जिल्ह्यात पूर्वहंगामी टोमॅटो लागवडीची लगबग सुरू

अनेक शेतकऱ्यांचा पूर्वहंगामी टोमॅटो लागवडीकडे कल असतो. चालू वर्षी पाणीसाठा आहे. मात्र, विषाणूजन्य रोगांच्या अफवामुळे दर स्थिर राहतील का? ही चिंता आहे. परराज्यातील भीती आहेच. मात्र, दरवर्षीच्या लागवडी खंडित व्हायला नको, यासाठी त्या सुरू ठेवल्या आहेत. - किरण लभडे, शेतकरी,निमगाव मढ,ता.येवला मागील वर्षाच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. तयार टोमॅटो रोपांची मागणी ७५ टक्क्यांनी घटली आहे. ज्यांनी पूर्वनोंदणी केली, त्यांची मागणीही कमी झाली आहे. - निलेश जगझाप, संचालक,विश्वकमल हायटेक नर्सरी,पालखेड, ता. निफाड
Pre-season tomato cultivation almost started in Nashik district
Pre-season tomato cultivation almost started in Nashik district

नाशिक  : मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत येवला तालुक्यात पूर्व हंगामी टोमॅटो लागवडीची जोखीम शेतकऱ्यांनी घेतली होती. चालू वर्षीही लागवडी मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाल्या आहेत. मात्र, अफवांच्या भीतीपोटी यंदा तुलनेत लागवड कमी होत असल्याचे चित्र आहे. 

चालू वर्षी उन्हाळ्यात पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगाच्या अफवा व वाढलेले तापमान, यामुळे लागवडी आठवडा भर लांबणीवर गेल्या आहेत. त्यातच अजूनही अफवांचा परिणाम दिसून येत आहे. टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात होत असल्याची चिन्हे आहेत. मात्र, येवला तालुक्यात काही शेतकऱ्यांनी जोखीम घेत पूर्वहंगामी टोमॅटो लागवडीला सुरुवात केली आहे. 

मान्सूनच्या तोंडावर अजूनही उन्हाचा कडाका कायम आहे. मात्र, अंदाज घेऊन येवला तालुक्यात निमगाव मढ, चिचोंडी, मुखेड, महालखेडा, भिंगारे, पाटोदा, नागडे, कातरणी तसेच चांदवड तालुक्यातील शेलू, पुरी, खडक ओझर, रेडगाव, निफाड नांदूर खुर्द यासह विविध गावांमध्ये लागवडी सुरू आहेत. यासह शेजारील कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये टोमॅटोची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. 

प्रामुख्याने भाजीपाला रोपवाटिकेतून टोमॅटो रोपे खरेदी करून लागवडी सूरु झाल्या आहेत. अनेकांनी हात आखडता घेतला आहे. मात्र, दरवर्षी दोन पैसे होत असल्याने हक्काचे पीक लागवड थांबायला नको. म्हणून काहींनी लागवडी केल्या. मात्र, त्यांचे क्षेत्र कमी आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर टंचाई आहे. त्यातच या अफवांची भीती आहे. त्यामुळे लागवडींना वेग दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अडचणीत घरच्या घरी तसेच मिळेल त्या मजुरांच्या साहाय्याने लागवडी सुरू आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com