Agriculture news in marathi Precipitation rains in Khandesh | Agrowon

खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २५) अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने पिकांची मोठी हानी झाली. जामनेर तालुक्‍यात वादळात पत्र्याच्या छप्परावरील दगड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा, मका आदींची हानी झाली. 

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २५) अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने पिकांची मोठी हानी झाली. जामनेर तालुक्‍यात वादळात पत्र्याच्या छप्परावरील दगड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा, मका आदींची हानी झाली. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्रीसह धुळे तालुक्‍यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर शहरासह परिसरात 
सायंकाळी तुरळक पाऊस झाला. गहू, मका काही भागात आडवा झाला. शॉर्टसर्किट झाल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. यापूर्वी १७ मार्चला सायंकाळी शहरात गारपिटीसह वादळी पाऊस झाला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

साक्री तालुक्‍यातही पिंपळनेर, देशशिरवाडे, पावडदेव, कड्याळे, पापडीपाडा, शेवगे, बल्हाणे, चिकसे, वंजारतांडा, उंभर्टी, शेलबारी, कातरवेल परिसरात गुरुवारी (ता. २६) दुपारी साडेचारला ढगांच्या गडगडाटासह पावसाने १५ मिनिटे हजेरी लावली. यामुळे कापणीसह काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची गव्हाचे पीक झाकण्यासाठी चांगलीच धांदल उडाली. धुळे तालुक्‍यातील लामकानीसह परिसरात काही वेळ तुरळक पाऊस झाला. शिंदखेडा शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते. 

जळगावात तुरळक पावसाच्या सरी 
जळगाव शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. दुपारी चारपासून ढगाळ वातावरण होते. सुमारे अर्धा तास वादळी वारा सुरू होता. वातावरणातही अचानक कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुरळक पाऊस सुरू झाला. या वादळ व पावसामुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य अचानक आलेल्या पावसामुळे ओले झाले.

जामनेर तालुक्‍यात महिला मृत्यूमुखी
जामनेर तालुक्‍यात गोरनाळा (ता. जामनेर) येथे पत्र्यावरील दगड पडून बुधवारी दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली. त्यावर ठेवलेला मोठा दगड डोक्‍यावर पडल्याने सुभद्रा मनोहर शेळके (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. 
 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...