Agriculture news in marathi Precipitation rains in Khandesh | Agrowon

खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २५) अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने पिकांची मोठी हानी झाली. जामनेर तालुक्‍यात वादळात पत्र्याच्या छप्परावरील दगड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा, मका आदींची हानी झाली. 

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २५) अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने पिकांची मोठी हानी झाली. जामनेर तालुक्‍यात वादळात पत्र्याच्या छप्परावरील दगड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा, मका आदींची हानी झाली. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्रीसह धुळे तालुक्‍यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर शहरासह परिसरात 
सायंकाळी तुरळक पाऊस झाला. गहू, मका काही भागात आडवा झाला. शॉर्टसर्किट झाल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. यापूर्वी १७ मार्चला सायंकाळी शहरात गारपिटीसह वादळी पाऊस झाला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

साक्री तालुक्‍यातही पिंपळनेर, देशशिरवाडे, पावडदेव, कड्याळे, पापडीपाडा, शेवगे, बल्हाणे, चिकसे, वंजारतांडा, उंभर्टी, शेलबारी, कातरवेल परिसरात गुरुवारी (ता. २६) दुपारी साडेचारला ढगांच्या गडगडाटासह पावसाने १५ मिनिटे हजेरी लावली. यामुळे कापणीसह काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची गव्हाचे पीक झाकण्यासाठी चांगलीच धांदल उडाली. धुळे तालुक्‍यातील लामकानीसह परिसरात काही वेळ तुरळक पाऊस झाला. शिंदखेडा शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते. 

जळगावात तुरळक पावसाच्या सरी 
जळगाव शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. दुपारी चारपासून ढगाळ वातावरण होते. सुमारे अर्धा तास वादळी वारा सुरू होता. वातावरणातही अचानक कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुरळक पाऊस सुरू झाला. या वादळ व पावसामुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य अचानक आलेल्या पावसामुळे ओले झाले.

जामनेर तालुक्‍यात महिला मृत्यूमुखी
जामनेर तालुक्‍यात गोरनाळा (ता. जामनेर) येथे पत्र्यावरील दगड पडून बुधवारी दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली. त्यावर ठेवलेला मोठा दगड डोक्‍यावर पडल्याने सुभद्रा मनोहर शेळके (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. 
 


इतर बातम्या
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...