agriculture news in Marathi, prediction of heavy rain, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुणे ः मराठवाडा, छत्तीसगड ते बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर अरबी समुद्र, कोकण, गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वाधिक २७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.  

पुणे ः मराठवाडा, छत्तीसगड ते बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर अरबी समुद्र, कोकण, गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वाधिक २७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.  

गेल्या आठवड्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश या भागात हवामान ढगाळ आहे. यामुळे कोकणात बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील पोलादपूर येथे सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर जव्हार, तलासरी, महाड, मोखेडा, भिरा, मंडनगड, माथेरान, मानगाव, तला, कर्जत या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिल्हांतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे १९०, तर भोरमधील भोलावडे येथे १८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर इगतपुरी १६०, जावळी मेढा १३०, पेठ ११०, पाटण ११०, वेल्हे १०० मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

सोलापूर, नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यातही पावसाच्या अधूनमधून सरी पडल्याने शेतकरी सुखावला आहे. तसेच कोयना (नवजा) या घाटमाथ्यावर २७०, अंबोने २००, कोयना १९०, दावडी १७०, शिरगाव, डुगरवाडी, खोपोली १४०, लोणावळा, ताम्हिणी १३०, भिरा १२०, शिरोटा, वानगाव, खांड ११०, भिवपुरी १०० मिलिमीटर पाऊ पडला. 

मराठवाड्यात हवामान ढगाळ असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील धर्माबाद, हिमायतनगर, माहूर, हदगाव, बिल्लोळी, किनवट, कल्लामनुरी, तुळजापूर, भूम, परांडा, मुदखेड, नांदेड येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर विदर्भातील भामरागड येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला. तर अहिरी, बल्लापूर, जयोती, इटापल्ली, चंद्रपूर, मुळचेरा, राजूरा, चार्मोशी, कोपर्णा, शिरोंचा, गोंडपिंप्री, चिखल्दा, धानोरा, पुसद, वाशीम, मूल येथे जोरदार पाऊस पडला.  
शुक्रवारी (ता. २) सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत - हवामान विभाग)
कोकण ः पोलादपूर १९०, जव्हार १६०, तलासरी १५०, महाड १३०, मोखेडा १३०, भिरा १२०, मंडनगड ११०, माथेरान, मानगाव, तला, कर्जत १००, म्हसळा, वाडा ९०, सुधागड पाली, पनवेल, मुरूड, श्रीवर्धन ७०, रोहा, शहापूर, खेड ६०, विक्रमगड, चिपळून, सावंतवाडी, संगमेश्वर देवरूख, पेणे, कल्याण ५०, सांताक्रुझ, दोडामार्ग, उल्हासनगर, खालापूर, मुलदे, ठाणे, लांजा, भिवंडी ४०, हर्णे, डहाणू, मुरबाड, कणकवली, कुडाळ, उरण, वैभववाडी, पालघर ३०
मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्वर २७०, त्र्यंबकेश्वर १९०, इगतपुरी १६०, जावळी मेढा १३०, पेठ ११०, पाटण ११०, वेल्हे १००, पौड, राधानगरी ९०, गगनबावडा ८०, वाई, चांदगड, नवापूर, शाहूवाडी, पन्हाळा ७०, भोर, लोणावळा, गारगोटी ६०, सातारा, सुरगाणा, कोरेगाव ५०, खेड, शिराळा, हरसूल, कागल, कराड, ओझरखेडा ४०, कडेगाव, खंडाळा बावडा, करवीर, कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, आंबेगाव, हातकणंगले ३०, खटाव, वडगाव, शिरोळ, पुणे शहर, माळशिरस, दिंडोरी, नाशिक, वाळवा, इस्लामपूर, अकोले, मोहोळ २०, 
मराठवाडा ः धर्माबाद ३०, हिमायतनगर, माहूर, हदगाव २०, बिल्लोळी, किनवट, कल्लामनुरी, तुळजापूर, भूम, परांडा, मुदखेड, नांदेड १०, 
विदर्भ ः भामरागड ७०, अहिरी, बल्लापूर ५०, जयोती, इटापल्ली, चंद्रपूर, मुळचेरा ४०, राजूरा, चार्मोशी, कोपर्णा, शिरोंचा, गोंडपिंप्री, चिखल्दा, धानोरा, पुसद, वाशीम, मूल २०, 
घाटमाथा ः कोयना (नवजा) २७०, अंबोने २००, कोयना १९०, दावडी १७०, शिरगाव, डुगरवाडी, खोपोली १४०, लोणावळा, ताम्हिणी १३०, भिरा १२०, शिरोटा, वानगाव,खांड ११०, भिवपुरी १००, ठाकूरवाडी ९०, वळवण ९०.

. . . . . . .

इतर अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...