agriculture news in Marathi, prediction of normal rain, Maharashtra | Agrowon

श्रावणसरींचाच अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे : राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह श्रावण सरींचा अनुभव येत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह श्रावण सरींचा अनुभव येत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. अरबी समुद्रावरील बाष्प या कमी दाब क्षेत्राकडे गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरी येत आहेत. उर्वरित राज्यात उन्ह सावल्यांच्या खेळात हलक्या सरी येत आहेत.

पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. १३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मंगळवारी आणि बुधवारी ओडीशा, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पूर्व भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : दोडामार्ग ६०, खालापूर, कुडाळ, मंडणगड, माथेरान, पोलादपूर प्रत्येकी ५०, पोलादपूर, लांजा, संगमेश्वर ४०, म्हसळा, मोखेडा, शहापूर, कणकवली, महाड, वैभववाडी, भिारा, तळा प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : पौड १३०, चंदगड १२०, महाबळेश्वर, राधानगरी प्रत्येकी १००, त्र्यंबकेश्वर ८०, गगणबावडा, लोणावळा, आजरा प्रत्येकी ७०, पन्हाळा, भोर, वेल्हा, जावळी मेढा प्रत्येकी ६०, गारगोटी, पाटण, इगतपूरी प्रत्येकी ५०, खेड, शाहूवाडी, वडगाव मावळ, पेठ प्रत्येकी ४०, सुरगाणा, अक्कलकुवा, अकोला प्रत्यकी ३०.

घाटमाथा : शिरगाव १७०, आंबोणे, दावडी ११०, ताम्हिणी ९०, वाणगाव ८०, लोणावळा, खंद, शिरोटा प्रत्येकी ७०, डुंगरवाडी, ठाकूरवाडी प्रत्येकी ६०.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...