शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य द्या ः कुलगुरू डाॅ. ढवण

शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य द्या ः कुलगुरू डाॅ. ढवण
शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य द्या ः कुलगुरू डाॅ. ढवण

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सोमवारी (ता. ११) राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथे अधिनस्थ विविध कार्यालयांच्या प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना करत प्रत्येक कार्यालयातील कार्यरत व्यक्‍तींनी एकोप्याने कामे करण्याचेही त्यांनी सुचविले. 

औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या कार्यालयात कृषी विद्यापीठांतर्गत कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या वेळी कुलगुरूंनी उपस्थित अधिकारी, शास्त्रज्ञाना मार्गदर्शन केले. 

कुलगुरू म्हणाले, ‘‘आपली  महत्त्वाची जी कामे शासनाच्या इतर विभागाशी निगडित असतात, अशावेळी सर्व कार्यालय प्रमुखांनी एकी दाखवत ही कामे मार्गी लावावी. अधिनस्त मंडळ अधिक जोमाने कशी कामे करतील यासाठीचे जे वातावरण अभिप्रेत असते ते प्रत्येक कार्यालयात निर्माण करावे. जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या शेतकरी बांधवांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील यासाठी आग्रही राहावे. शेतकरी बांधव हे सध्याच्या परिस्थितीने त्रस्त असतील. त्यामुळे त्यांना कशाप्रकारे दिलासा देता येईल याचा विचार करावा. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार यांचा विस्तारातील मोठा अनुभव कृषी विभागातील ओळख ही जमेची बाजू आहे. त्या बाजूचा विचार करत कृषी विभागातील शेतकरीभिमुख मंडळींच्या साह्याने शेतकरी बांधवांची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत’’ अशी अपेक्षाही कुलगुरूंनी व्यक्त केली.

विद्यापीठात वेगवेगळी रिक्त पदे कशी भरता येतील, हे ही पाहिल्या जाईल असेही कुलगुरू म्हणाले. या चर्चेत सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, फळ आणि मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील, प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय डॉ. किरण जाधव आणि कडधान्य आणि बाजरा पैदासकार डॉ. दीपक पाटील यांनी सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com