Agriculture news in Marathi Prefer soybean, sunflower oil instead of palm oil | Agrowon

पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला पसंती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 डिसेंबर 2021

पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची नोव्हेंबरमध्ये आयात वाढली आहे. पामतेल आणि सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या दरातील फरक कमी झाल्याने पामतेलाची आयात ऑक्टोबरच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली.

पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची नोव्हेंबरमध्ये आयात वाढली आहे. पामतेल आणि सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या दरातील फरक कमी झाल्याने पामतेलाची आयात ऑक्टोबरच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली. तर सोयाबीन तेलाची आयात जवळपास दुप्पट झाली. भारताला खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. 

देशात दरवर्षी १३० ते १५० लाख टनांच्या दरम्यान खाद्यतेल आयात करावी लागते. त्यात पामतेलाचा वाटा जवळपास ६० टक्क्यांच्या दरम्यान असतो. भारतात मुख्यतः मलेशिया आणि इंडोनेशियातून पामतेलाची आयात होते. मात्र, कोरोनाच्या काळात जागतिक व्यापारात अडचणी निर्माण झाल्या. तसेच या दोन्ही देशांत पाम काढणीसाठी मजूर टंचाई, आयातीच्या वाहतुकीत झालेली वाढ आणि तेलाच्या उत्पादनात घट झाल्याने वाढलेले दर यामुळे पामतेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पामतेलाऐवजी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाला रिफायनरींनी पसंती दिली. देशात सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटिना आणि ब्राझिलमधून होते तर युक्रेन आणि रशियातून सूर्यफूल तेलाची आयात होते. 

किती झाली तेल आयात
देशात नोव्हेंबर महिन्यात पामतेल आयात घटली आहे. ऑक्टोबर महिन्यात देशात ६.९१ लाख टन पामतेल आयात झाली होती. नोव्हेंबरमध्ये पामतेल आयातीत १० टक्क्यांनी घट होऊन ५.८५ लाख टनांवर आयात पोचली. नोव्हेंबरमध्ये पामतेलाची आयात घटली असली तरी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत सोयाबीन तेलाची आयात १.८३ लाख टनांनी घटली आहे. ऑक्टोबरमध्ये २.१७ लाख टन सोयाबीन तेलाची आयात झाली होती. तर नोव्हेंबरमध्ये ४ लाख टन सोयाबीन तेल देशात दाखल झाले. तर सूर्यफूल तेलाची आयात १.१७ लाख टनांवरून २ लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते नोव्हेंबरमध्ये पामतेल आयात ६ लाख टनांपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सोयाबीन तेलाची आयात ४ लाख टनांवर स्थिरावेल. 

काय दराची स्थिती
मागील वर्षी सोयाबीन तेल आयात पामतेलाच्या तुलनेत १२० डॉलर प्रतिटनाने महाग होत होती. मात्र, पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने यंदा केवळ २० डॉलर प्रतिटनाने सोयाबीन तेल महाग पडत आहे. नोव्हेंबरमध्ये भारतात कच्चे पामतेल आयात खर्च १३९५ डॉलर प्रतिटन आला. तर सोयाबीनचा प्रतिटन आयात खर्च १४१५ डॉलर प्रतिटन आणि सूर्यफूल तेलाचा खर्च १४४५ डॉलर प्रतिटन आला. पाम तेलाच्या तुलनेत सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा आयात खर्च मोठ्या प्रमाणात जास्त नव्हता.


इतर अॅग्रो विशेष
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...