खानदेशात ताग लागवडीला पसंती

जळगाव ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही येणारे पीक म्हणून खानदेशात अनेक भागात शेतकऱ्यांनी ताग पिकाला पसंती दिली आहे. तागाची लागवडीत यंदा सुमारे २०० ते ३०० हेक्टरने वाढ झाली आहे.
 Preference for hemp cultivation in Khandesh
Preference for hemp cultivation in Khandesh

जळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही येणारे पीक म्हणून खानदेशात अनेक भागात शेतकऱ्यांनी ताग पिकाला पसंती दिली आहे. तागाची लागवडीत यंदा सुमारे २०० ते ३०० हेक्टरने वाढ झाली आहे. 

ताग पीक काळी कसदार जमीन व सुपीक पटट्ट्यात घेतले जाते. त्यात हे पीक जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, यावल, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा भागात असते. खानदेशात दरवर्षी सुमारे ६०० ते ७०० हेक्टरवर तागाची लागवड केली जाते. यंदा ही लागवड सुमारे ९०० हेक्टरवर पोचली आहे. याचे कारण म्हणजे यंदा जळगाव, धुळे व नंदुरबारात सुरवातीला पाऊस आला, पण नंतर १५ ते १८ दिवस पावसाचा खंड पडला.

कोरडवाहू कापूस, सोयाबीन पिकाचे आतोनात नुकसान झाले. ही पिके मोडून त्यात काही शेतकऱ्यांनी बाजरी पेरली, तर अनेकांनी तागाला पसंती दिली. तागाची अनेक खरेदीदार शिवार खरेदी करतात. जागेवरच खरेदी व बऱ्यापैकी दर मिळतात. यामुळे तागाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तागाचे उत्पादन व्यवस्थितपणे आले होते. यंदाही उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आले. 

दिवाळीला पिकाची काढणी यंदा होऊ शकते. सध्या पिकाची वाढ बरी आहे. परंतु, त्याला पावसाची नितांत गरज आहे. कारण कमाल शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात तागाची पेरणी केली आहे. पिकात आंतरमशागत, खते देण्याचे काम पूर्ण झाले आहे. उंची दीड ते दोन फुटांपर्यंत वाढली आहे. वाढ बरी असल्याने उत्पादनही चांगले येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगावात ५०० हेक्टर क्षेत्र

जळगाव जिल्ह्यात सुमारे ५०० हेक्टरवर ताग पेरणी झाली आहे. यापाठोपाठ नंदुरबार व धुळ्यात पेरणी झाली आहे. काही कंपन्यांनी यासाठी करार करून बियाणे उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती मिळाली. तर अनेक शेतकऱ्यांनी शासकीय संस्थांकडून बियाणे  खरेदी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com