ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
बातम्या
पुणे जिल्ह्यात ४०५ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज
पुणे ः गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४०५ हेक्टरवरील फळबागा आणि पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केैला आहे.
पुणे ः गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४०५ हेक्टरवरील फळबागा आणि पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केैला आहे. तर यामध्ये सुमारे ५ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे, असे देखील प्राथमिक पाहणीमध्ये समोर आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
अद्याप पंचनामे सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल तयार होऊन, नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस सलग अवकाळी पावसाने पिकांना फटका बसला. यामध्ये प्रामुख्याने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. काढणीला आलेल्या निर्यातक्षम द्राक्षांसह, मोहोर लागलेल्या आंब्याचा त्यात समावेश आहे.
भाजीपाल्याला देखील फटका बसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, असे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
- 1 of 1500
- ››