agriculture news in marathi Preliminary processing of vegetables | Page 3 ||| Agrowon

भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रिया

डॉ. साधना उमरीकर, डॉ.दीपक कछवे
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

सौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या साहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करून भाज्या सुकविता येतात. अशा ड्रायरमध्ये भाजीपाला कमी वेळात सुरक्षितपणे वाळविता येतो.
 

सौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या साहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करून भाज्या सुकविता येतात. अशा ड्रायरमध्ये भाजीपाला कमी वेळात सुरक्षितपणे वाळविता येतो.

भाज्यांची काढणी केल्यानंतर विक्रीपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक असते. काढणी केल्यानंतर भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. यामुळे खराब व रोगट फळे,भाजी बाजूला काढावी. त्यानंतर आकार व रंगानुसार भाज्यांची प्रतवारी करावी. योग्य पद्धतीने पॅकिंग करावे. यामुळे वाहतूक करताना होणारे नुकसान टाळता येते. 

भाजीपाला काही दिवस शून्य ऊर्जा शीतगृहात ७ ते ८ अंश सेल्सिअस आणि ८५ ते ९५ टक्के आर्द्रतेमध्ये भाज्या ७ ते ८ दिवस चांगल्या राहतात. 

भाजीपाला सुकविण्यासाठी ड्रायर
सौर ऊर्जेवरील ड्रायर

सौर उर्जेद्वारे भाज्या वाळवता येत असल्यामुळे वीजेचा खर्च वाचतो. अशा प्रकारचे ड्रायरमध्ये सुकविलेल्या भाज्यांची योग्य प्रकारे साठवण केल्यास सहा महिने ते एक वर्ष चांगल्या टिकतात.

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सौर ऊर्जेवर आधारित ड्रायर तयार केला आहे. त्यांची अंदाजे किंमत १२,००० रुपये आहे.
  • आरती संस्थेने बांबू पासून तयार केलेला सोलर ड्रायर. अंदाजित किंमत:  ७,००० ते  ८,००० रुपये
  • सायन्स फॉर सोसायटी यांनी तयार केलेला  सोलर ड्रायर. अंदाजित किंमत:  ३०,००० ते ३५,००० रुपये.

इलेक्ट्रिक ड्रायर
विविध क्षमतेनुसार बाजारात इलेक्ट्रिक ड्रायर उपलब्ध असून त्यांच्या किमतीमध्ये विविधता आहे. यासाठी विजेचा वापर होत असल्यामुळे सुकविण्याचा खर्च वाढतो.अंदाजित किंमत ः  १८,००० ते  ३०,००० रुपये

भाजीपाल्यावर प्रक्रिया
भाजीपाला शास्त्रोक्त पद्धतीने सुकवावा. सूर्याच्या उष्णतेने उघड्यावर देखील पारंपरिक पद्धतीने भाज्या सुकविल्या जातात. पण अशा प्रकारे भाजी सुकविताना स्वच्छतेबाबत योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. सुकविताना त्यावर  आच्छादन घालावे. या शिवाय सौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या साहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करून भाज्या सुकविता येतात. अशा ड्रायरमध्ये भाजीपाला कमी वेळात सुरक्षितपणे सुकवता येतो. सुकविलेल्या भाज्या अंदाजे वर्षभर चांगल्या टिकतात.

भाजीपाला सुकविण्यासाठी प्राथमिक प्रक्रिया
 

भाजीचे नाव प्राथमिक प्रक्रिया प्रक्रिया पदार्थ
पालेभाज्या
पालक निवडणे, धुणे  उकळत्या पाण्यात ०.५% पोटॅशियम मेटा बाय सल्फेट व ०.१% खाण्याचा सोडा मिसळून या द्रावणात २ मिनिटे बुडवणे  पावडर, पेस्ट
कोथिंबीर निवडणे, धुणे   वरील प्रमाणे  पावडर
मेथी निवडणे, धुणे  वरील प्रमाणे   पावडर
कढीपत्ता धुणे व पाने वेगळी करून सावलीत सुकविणे वरील प्रमाणे पावडर
शेवगा  शेंगाच्या शिरा काढून तुकडे करणे  वरील प्रमाणे पावडर
कंदवर्गीय 
कांदा  बारीक काप किंवा कीस करून सुकविणे    ५ % मिठाच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावेत   पावडर, पेस्ट
लसूण  सोलून पाकळ्या सुकविणे  --  पावडर, पेस्ट
आले   काप करणे किंवा कीस करणे   ५ % मिठाच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावेत   पावडर, पेस्ट
बटाटा   साल काढून बारीक चकत्या/काप करावेत   ब्लिचिंग ३-४ मिनिटे , ०.१२५ % पोटॅशियम मेटा बाय सल्फेट द्रावणात १० मिनिटे बुडवणे  पावडर, वेफर्स
गाजर साल काढून बारीक चकत्या/काप करावेत    ब्लिचिंग ३-४ मिनिटे , ०.१२५ % पोटॅशियम मेटा बाय सल्फेट द्रावणात १० मिनिटे बुडवणे   कीस, पावडर, मुरंबा, लोणचे, वडी
इतर भाज्या
गवार  धुणे, तुकडे करणे. सुकविणे  गवार तुकडे, गवार गम
टोमॅटो धुणे व तुकडे करणे ब्लाचिंग करणे  केचप, पावडर, रस, पेस्ट, चटणी
मसालेवर्गीय
हळद चांगली हळद निवडणे   -- पावडर, लोणचे, कुरकुमीन तयार करणे
मिरची निवडणे, देठ काढणे  सुकविणे     पावडर, पेस्ट
जिरे, ओवा, धने, काळे मिरे निवडणे, सुकविणे कडक उन्हात सुकविणे पावडर
वेलवर्गीय भाज्या
कारले  पातळ काप करणे  ब्लिचिंग ५ मिनिटे, ०.२५ % पोटॅशियम मेटा बाय सल्फेट द्रावणात १० मिनिटे बुडवणे पावडर
भोपळा पातळ काप करणे, कीस करणे वरील प्रमाणे  पावडर, पेस्ट

संपर्क -  डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७,डॉ.दीपक कछवे,९४२३७००७३० (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर जि. जालना)


इतर कृषी प्रक्रिया
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...