हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
कृषी प्रक्रिया
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रिया
सौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या साहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करून भाज्या सुकविता येतात. अशा ड्रायरमध्ये भाजीपाला कमी वेळात सुरक्षितपणे वाळविता येतो.
सौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या साहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करून भाज्या सुकविता येतात. अशा ड्रायरमध्ये भाजीपाला कमी वेळात सुरक्षितपणे वाळविता येतो.
भाज्यांची काढणी केल्यानंतर विक्रीपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक असते. काढणी केल्यानंतर भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. यामुळे खराब व रोगट फळे,भाजी बाजूला काढावी. त्यानंतर आकार व रंगानुसार भाज्यांची प्रतवारी करावी. योग्य पद्धतीने पॅकिंग करावे. यामुळे वाहतूक करताना होणारे नुकसान टाळता येते.
भाजीपाला काही दिवस शून्य ऊर्जा शीतगृहात ७ ते ८ अंश सेल्सिअस आणि ८५ ते ९५ टक्के आर्द्रतेमध्ये भाज्या ७ ते ८ दिवस चांगल्या राहतात.
भाजीपाला सुकविण्यासाठी ड्रायर
सौर ऊर्जेवरील ड्रायर
सौर उर्जेद्वारे भाज्या वाळवता येत असल्यामुळे वीजेचा खर्च वाचतो. अशा प्रकारचे ड्रायरमध्ये सुकविलेल्या भाज्यांची योग्य प्रकारे साठवण केल्यास सहा महिने ते एक वर्ष चांगल्या टिकतात.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सौर ऊर्जेवर आधारित ड्रायर तयार केला आहे. त्यांची अंदाजे किंमत १२,००० रुपये आहे.
- आरती संस्थेने बांबू पासून तयार केलेला सोलर ड्रायर. अंदाजित किंमत: ७,००० ते ८,००० रुपये
- सायन्स फॉर सोसायटी यांनी तयार केलेला सोलर ड्रायर. अंदाजित किंमत: ३०,००० ते ३५,००० रुपये.
इलेक्ट्रिक ड्रायर
विविध क्षमतेनुसार बाजारात इलेक्ट्रिक ड्रायर उपलब्ध असून त्यांच्या किमतीमध्ये विविधता आहे. यासाठी विजेचा वापर होत असल्यामुळे सुकविण्याचा खर्च वाढतो.अंदाजित किंमत ः १८,००० ते ३०,००० रुपये
भाजीपाल्यावर प्रक्रिया
भाजीपाला शास्त्रोक्त पद्धतीने सुकवावा. सूर्याच्या उष्णतेने उघड्यावर देखील पारंपरिक पद्धतीने भाज्या सुकविल्या जातात. पण अशा प्रकारे भाजी सुकविताना स्वच्छतेबाबत योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. सुकविताना त्यावर आच्छादन घालावे. या शिवाय सौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या साहाय्याने प्राथमिक प्रक्रिया करून भाज्या सुकविता येतात. अशा ड्रायरमध्ये भाजीपाला कमी वेळात सुरक्षितपणे सुकवता येतो. सुकविलेल्या भाज्या अंदाजे वर्षभर चांगल्या टिकतात.
भाजीपाला सुकविण्यासाठी प्राथमिक प्रक्रिया
भाजीचे नाव | प्राथमिक प्रक्रिया | प्रक्रिया | पदार्थ |
पालेभाज्या | |||
पालक | निवडणे, धुणे | उकळत्या पाण्यात ०.५% पोटॅशियम मेटा बाय सल्फेट व ०.१% खाण्याचा सोडा मिसळून या द्रावणात २ मिनिटे बुडवणे | पावडर, पेस्ट |
कोथिंबीर | निवडणे, धुणे | वरील प्रमाणे | पावडर |
मेथी | निवडणे, धुणे | वरील प्रमाणे | पावडर |
कढीपत्ता | धुणे व पाने वेगळी करून सावलीत सुकविणे | वरील प्रमाणे | पावडर |
शेवगा | शेंगाच्या शिरा काढून तुकडे करणे | वरील प्रमाणे | पावडर |
कंदवर्गीय | |||
कांदा | बारीक काप किंवा कीस करून सुकविणे | ५ % मिठाच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावेत | पावडर, पेस्ट |
लसूण | सोलून पाकळ्या सुकविणे | -- | पावडर, पेस्ट |
आले | काप करणे किंवा कीस करणे | ५ % मिठाच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावेत | पावडर, पेस्ट |
बटाटा | साल काढून बारीक चकत्या/काप करावेत | ब्लिचिंग ३-४ मिनिटे , ०.१२५ % पोटॅशियम मेटा बाय सल्फेट द्रावणात १० मिनिटे बुडवणे | पावडर, वेफर्स |
गाजर | साल काढून बारीक चकत्या/काप करावेत | ब्लिचिंग ३-४ मिनिटे , ०.१२५ % पोटॅशियम मेटा बाय सल्फेट द्रावणात १० मिनिटे बुडवणे | कीस, पावडर, मुरंबा, लोणचे, वडी |
इतर भाज्या | |||
गवार | धुणे, तुकडे करणे. | सुकविणे | गवार तुकडे, गवार गम |
टोमॅटो | धुणे व तुकडे करणे | ब्लाचिंग करणे | केचप, पावडर, रस, पेस्ट, चटणी |
मसालेवर्गीय | |||
हळद | चांगली हळद निवडणे | -- | पावडर, लोणचे, कुरकुमीन तयार करणे |
मिरची | निवडणे, देठ काढणे | सुकविणे | पावडर, पेस्ट |
जिरे, ओवा, धने, काळे मिरे | निवडणे, सुकविणे | कडक उन्हात सुकविणे | पावडर |
वेलवर्गीय भाज्या | |||
कारले | पातळ काप करणे | ब्लिचिंग ५ मिनिटे, ०.२५ % पोटॅशियम मेटा बाय सल्फेट द्रावणात १० मिनिटे बुडवणे | पावडर |
भोपळा | पातळ काप करणे, कीस करणे | वरील प्रमाणे | पावडर, पेस्ट |
संपर्क - डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७,डॉ.दीपक कछवे,९४२३७००७३० (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर जि. जालना)
- 1 of 16
- ››