Agriculture News in Marathi Premature ejaculation Meeting in Kolhapur tomorrow | Agrowon

पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात बैठक 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड देण्याप्रश्‍नी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी (ता.२१) पूरबाधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व आंदोलक संघटना यांची व्यापक बैठक घेण्याची ग्वाही दिली.

कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड देण्याप्रश्‍नी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी (ता.२१) पूरबाधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व आंदोलक संघटना यांची व्यापक बैठक घेण्याची ग्वाही दिली. खासदार धैर्यशील माने यांच्यासह आंदोलन अंकुशच्या मागणीवरून जिल्हाधिकारी यांनी साखर सह संचालकांना या बाबतचे आदेश दिले. 

पूरबाधित ऊस तोडण्यास अनेक कारखाने शेतकऱ्यांची गळचेपी करतात. पूरबाधित ऊस तोडताना मजूर व वाहतूकदाराकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पूरबाधित क्षेत्राची माहिती व ते तोडण्याचे नियोजन ही सर्व माहिती साखर कारखान्यानी हजर करून त्याप्रमाणे या हंगामात अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी साखर कारखान्यांना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली. ती तत्काळ मान्य करून जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (ता.२१) सायंकाळी पूरबाधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व आंदोलक संघटना यांची व्यापक बैठक घेण्याचे मान्य केले. 

आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘‘महापुराचा ऊस शेतीला फटका बसला आहे. बाधित ऊस तातडीने तोडण्याची गरज आहे. या आधीच्या पुरावेळी कारखानदारांनी बाधित ऊस प्राधान्याने तोडण्याची ग्वाही दिली. मात्र, कार्यवाही केली नाही. त्यामुळे या वर्षी असा प्रकार घडू नये. बाधित उसाची प्राधान्याने तोडणी करावी.’’ या वेळी दत्तात्रय जगदाळे, सुनील बाबर, वीरचंद पाटील उपस्थित होते.


इतर बातम्या
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील काजू...
पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...
औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे...औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात...