Agriculture news in Marathi Premature forecast from today | Agrowon

अवकाळीचा आजपासून अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे.

पुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.  

राज्यातील व देशातील वातावरणात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी उन्हाचा चटका, तर काही ठिकाणी उन्हाची लाट असे प्रकार घडत आहेत. त्यातच गुरुवारी उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि परिसर बिहार ते पूर्व विदर्भ पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रीय होत आहे. कोमोरिनचा भाग आणि परिसर ते उत्तर कर्नाटक या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर सुमात्रा किनारपट्टीदरम्यान चक्रिय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ते १.५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे.

सध्या काही भागांत अंशत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे उकाड्यात किंचित घट झाल्याने कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. काही भागांत किमान तापमानातही वाढ झाली आहे. पुणे येथे १९.३ सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

येथे अवकाळी पावसाची शक्यता
शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
शनिवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...