agriculture news in marathi Premature loss of gram, sorghum and wheat crops in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे हरभरा, ज्वारी, गहू, या रब्बी पिकांचे, उन्हाळी भुईमुगाचे मोठे नुकसान झाले.

परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे हरभरा, ज्वारी, गहू, या रब्बी पिकांचे, उन्हाळी भुईमुगाचे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा दाव्यांसाठी ६ हजार ३५८ तक्रार अर्ज विमा कंपनीकडे सादर केले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात गुरुवार (ता.१८) ते रविवार (ता.२१ ) या कालावधीत  झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ५ हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम नुकसान क्षेत्र स्पष्ट होईल.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई विमा दाव्यांसाठी तक्रारी विमा कंपनीकडे दाखल करा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. 

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील एकूण ६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. पीकनिहाय तक्रार अर्जामध्ये हरभऱ्याचे ३ हजार ३१७ तक्रार अर्ज, ज्वारीचे २ हजार २०७, गव्हाचे ९९० तक्रार अर्ज, उन्हाळी भुईमूग पीक नुकसानीबद्दल २४ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...