चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ 

कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना शासनाने चिकू उत्पादकांना संकटात टाकले आहे.
chiku crop
chiku crop

पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना शासनाने चिकू उत्पादकांना संकटात टाकले आहे. पंतप्रधान हंगामी पीकविमा योजनेत पालघर जिल्ह्यातील चिकू फळपीक विमा योजनेत शेतकरी हिश्‍शात हेक्टरी सहा पटीने वाढ करत ३ हजारांवरून तब्बल १८ हजार रुपये केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

पालघर जिल्ह्यातील चिकू पिकासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर यादरम्यान दहा दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि आठ दिवस २० मिलिमीटर सतत पाऊस असल्यास हेक्टरी साठ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. तर पाच दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि चार दिवस २० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास हेक्‍टरी २७ हजार रुपये नुकसानभरपाई २०२१ खरीप हंगामासाठी मंजूर झाली आहे. चालू वर्षी रिलायन्स ग्रुपला हे काम देण्यात आले. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिकू बागायतदारांना हेक्टरी १८ हजार रुपये इतका हिस्सा भरावा लागणार आहे. तर केंद्र सरकार ७५०० व राज्य सरकार २५ हजार ५०० रुपये हिस्सा भरणार आहे. मागच्या वर्षी किंवा त्यापूर्वी शेतकऱ्यांचा हिस्सा फक्त तीन हजार रुपये इतका होता. चालू हंगामात तो सहा पटीने वाढवून १८ हजार रुपये इतका झाला आहे.  ही शेतकऱ्यांची लूटच  इतर फळांच्या तुलनेत स्वस्त दरात विक्री होणाऱ्या चिकू पिकाला अशाप्रकारे प्रचंड रकमेचा हिस्सा भरण्याची सक्ती करून सरकार वीमा कंपनीच्या भल्यासाठी योजना राबवते काय, असा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी आणि बागातदार अनिल पाटील यांनी केला आहे. एकंदरीतच कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला तारणाऱ्या शेतकऱ्याला खासगीकरणाच्या षड्‌यंत्राखाली सध्या लुटण्याचे काम सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com