agriculture news in Marathi premium of chiku insurance increased by six times Maharashtra | Page 2 ||| Agrowon

चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना शासनाने चिकू उत्पादकांना संकटात टाकले आहे.

पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना शासनाने चिकू उत्पादकांना संकटात टाकले आहे. पंतप्रधान हंगामी पीकविमा योजनेत पालघर जिल्ह्यातील चिकू फळपीक विमा योजनेत शेतकरी हिश्‍शात हेक्टरी सहा पटीने वाढ करत ३ हजारांवरून तब्बल १८ हजार रुपये केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

पालघर जिल्ह्यातील चिकू पिकासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर यादरम्यान दहा दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि आठ दिवस २० मिलिमीटर सतत पाऊस असल्यास हेक्टरी साठ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. तर पाच दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि चार दिवस २० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास हेक्‍टरी २७ हजार रुपये नुकसानभरपाई २०२१ खरीप हंगामासाठी मंजूर झाली आहे.

चालू वर्षी रिलायन्स ग्रुपला हे काम देण्यात आले. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिकू बागायतदारांना हेक्टरी १८ हजार रुपये इतका हिस्सा भरावा लागणार आहे. तर केंद्र सरकार ७५०० व राज्य सरकार २५ हजार ५०० रुपये हिस्सा भरणार आहे. मागच्या वर्षी किंवा त्यापूर्वी शेतकऱ्यांचा हिस्सा फक्त तीन हजार रुपये इतका होता. चालू हंगामात तो सहा पटीने वाढवून १८ हजार रुपये इतका झाला आहे. 

ही शेतकऱ्यांची लूटच 
इतर फळांच्या तुलनेत स्वस्त दरात विक्री होणाऱ्या चिकू पिकाला अशाप्रकारे प्रचंड रकमेचा हिस्सा भरण्याची सक्ती करून सरकार वीमा कंपनीच्या भल्यासाठी योजना राबवते काय, असा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी आणि बागातदार अनिल पाटील यांनी केला आहे. एकंदरीतच कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला तारणाऱ्या शेतकऱ्याला खासगीकरणाच्या षड्‌यंत्राखाली सध्या लुटण्याचे काम सुरू आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...
पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...
शेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...
कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...
राज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे  : कोकणाच्या काही भागांत...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...