वऱ्हाडात ‘पूर्वमोसमी’ची वादळी हजेरी

वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसाने उन्हाळी पिके, फळबागांना फटका बसला, शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
वऱ्हाडात ‘पूर्वमोसमी’ची वादळी हजेरी
वऱ्हाडात ‘पूर्वमोसमी’ची वादळी हजेरी

अकोला ः वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसाने उन्हाळी पिके, फळबागांना फटका बसला, शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.  अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी दिली. पातूरमधील चतारी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतामध्ये असलेल्या उन्हाळी मूग, कांदा, भुईमूग पिकांचे नुकसान झाले. तेल्हारा, अकोट तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. अडगाव, पंचगव्हाण, दानापूर, शिरसोली भागांत पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. बार्शीटाकळी तालुक्यात हातोला, झोडगा, वस्तापूर, भेंडगाव, पिंजर, निंभारा आदी गावांसह इतर ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला.  बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील शेलगाव, खंडाळा शिवारात बुधवारी गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे कांदा बीजोत्पादन क्षेत्रात मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेले कांदा बियाणे गळून पडले. काही शेतकऱ्यांचे शाळू ज्वारीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावून नेला आहे. 

फळबागांचे नुकसान बुधवारी पावसापेक्षा वादळाचे प्रमाण अधिक होते. यामुळे केळीच्या झाडांवरील पाने सर्वत्र फाटली. नव्याने लागवड असलेल्या केळी बागांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com