उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज; उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता

राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता.३०) राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा शक्यता आहे.
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज; उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज; उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता

पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता.३०) राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा शक्यता आहे. तर तापमानात घट होऊन राज्यात आलेली उष्ण लाट कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरूवारी (ता.२८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ वादळामुळे उत्तरेकडील उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राकडे आल्याने आठवडभर विविध भागात उष्ण लाट आली होती. सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने वायव्य आणि मध्य भारतातील राज्यामध्ये उन्हाचा चटका चांगला वाढला होता. राजस्थानातील चुरू येथे देशातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरूवारी (ता.२८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चुरू येथे ४९.६ कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या तापमानातही काहीशी घट झाल्याचे दिसून आले. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती येथे उष्ण लाट आहे. उर्वरित भागात मात्र लाट ओसरली आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उद्यापासून (ता.३०) राज्यात वादळी पावसाला सुरुवात होणार असून, सोमवारपर्यंत (ता.१) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवारी (ता.३१) कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरूवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, धुळे ४२.४, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३५.१, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४३.६, नाशिक ३७.३, निफाड ३७.५, सातारा ३६.७, सांगली ३७.०, सोलापूर ४१.४, डहाणू ३५.३, सांताक्रूझ ३४.४, रत्नागिरी ३४.६, औरंगाबाद ४१.७, परभणी ४४.०, नांदेड ४३.५, अकोला ४४.६, अमरावती ४५.०, बुलडाणा ४१.२, ब्रह्मपुरी ४३.७, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४४.८, नागपूर ४६.०, वर्धा ४५.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com