Preparation of administration for Shri Siddheshwar Yatra is complete
Preparation of administration for Shri Siddheshwar Yatra is complete

श्री सिद्धेश्‍वर यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

सोलापूर : ‘‘ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज आहे. विविध विभागांनी समन्वय ठेवून यात्रा कालावधीत काम करावे,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.

श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या तयारीसाठी संयुक्त नियोजन बैठक झाली. जिल्हाधिकारी भोसले, आयुक्त दीपक तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, पोलिस उपायुक्त बापू बांगर, वैशाली कडूस्कर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

बैठकीत सुरुवातीला यात्रा समितीने स्टीलचे बॅरिकेडिंग करावे, मनोरंजनाचे पाळणे आणि विविध साहित्यांची यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून घ्यावी, वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना हेमंत निकम यांनी केल्या. 

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. भाविकांना सूचना देण्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट  सिस्टिम विकसित करावी, बाँब शोधक पथक सज्ज ठेवावे. अक्षता सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी मंदिर समितीने नियोजन करावे. वीजपुरवठा घेताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करावी, त्याशिवाय ही कामे करू नयेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुंपणास लागून असलेला रस्ता आपत्कालीन परिस्थितीसाठी मोकळा सोडायलाच हवा. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. त्याचबरोबर देवस्थान समितीने महापालिकेस थकीत रक्कम तत्काळ भरावी.’’ 

देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले, ‘‘यात्रा कालावधीपूर्वी होम मैदान आणि परिसरातील विविध कामे पूर्ण करावी.’’ त्यावर नगर अभियंता संदीप कारंजे यांनी ही कामे येत्या आठवड्यात पूर्ण केली जातील, असे सांगितले.

बांगर म्हणाले, ‘‘मैदानावर सायंकाळी धुळीचे प्रमाण वाढते. त्याचा बंदोबस्त आणि इतर बाबीवर परिणाम होतो. त्यावर देवस्थान समितीने ठोस उपाययोजना करावी.’’ 

बैठकीस उत्तर सोलापूरचे तहसीलदार जयवंत पाटील, यात्रा समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे, गिरीश गोरनळ्ळी, बसवराज अष्टगी, शिवकुमार पाटील, बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्‍वर बमणी, नीलकंठप्पा कोनापुरे, गुरुराज माळगे, विश्‍वनाथ हब्बा आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com