agriculture news in Marathi, Preparation of Forest Department for Wildlife Conservation in farm | Agrowon

वन्यप्राणी बंदोबस्तासाठी वनविभागाचे उपाय सुरू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 मे 2019

नेसरी, जि. कोल्हापूर ः वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती आजरा परिक्षेत्र वनाधिकारी डॉ. सुनील लाड यांनी दिली. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व वनविभागातर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

नेसरी, जि. कोल्हापूर ः वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती आजरा परिक्षेत्र वनाधिकारी डॉ. सुनील लाड यांनी दिली. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व वनविभागातर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

या वेळी गवे, हत्ती व अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीबाबत शिवसेना पदाधिकारी, वनाधिकारी, शेतकरी यांच्यात चर्चा झाली. बैठकीस जिल्हाप्रमुख विजय देवणे, सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांची उपस्थिती होती. या वेळी अर्जुनवाडीकरांना वन्यजीवांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सूरबाणांचे वाटप करण्यात आले.

देवणे म्हणाले, ‘‘वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने वनविभाग कार्यालयावर आंदोलन करू. हत्ती नागरी वस्तीत येऊ नये म्हणून उपाययोजना करा, शेतीची भरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी, वन्यप्राण्यांसाठी चारापाणी व्यवस्था जंगलात करावी, प्रतिबंधक चरीही खोदाव्यात.’’

कुपेकर यांनी चंदगड मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान नित्याचे झाले असून, तुटपुंजी असलेली भरपाई वाढवून देण्याची सूचना केली. शिंत्रे यांनी हत्ती किंवा गवे आले म्हणून तात्पुरती उपाययोजना करू नये, अशी सूचना केली. खांडेकर यांनी शिवसेनेतर्फे सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. 

डॉ. लाड म्हणाले, ‘‘कोणताही वन्यप्राणी दिसताच त्याची माहिती वनविभागाला द्यावी. वनविभागातर्फे नियोजनबद्ध या प्राण्यांना जंगल भागात हाकलले जाईल. दंगा, मस्ती किंवा हुसकविण्याचा प्रयत्न करू नका. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात येईल. वन्यजीवासाठी वनतळी, हत्ती प्रतिबंधक चर खोदणे, बांबू लागवड, लोखंडी कुंपण आदी उपाययोजना सुरू आहेत. आजरा परिक्षेत्रासाठी लवकरच रेस्क्‍यू व्हॅनही येणार आहे.’’ 

सरपंच श्यामराव नाईक, संजय मंडलिक, उपसरपंच रामचंद्र पाटील, प्रकाश पाटील, नारायण पाटील, शिवाजी पाटील, पांडुरंग जाधव, दत्ता पाटील, महेंद्र पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला.


इतर बातम्या
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...