सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी, बासुंदी

सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सीताफळापासून आइस्क्रीम, रबडी, श्रीखंड, बासुंदी मिल्कशेक असे विविध पदार्थ केले जातात.
 Ice cream, rabadi, basundi from custard apple
Ice cream, rabadi, basundi from custard apple

सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सीताफळापासून आइस्क्रीम, रबडी, श्रीखंड, बासुंदी मिल्कशेक असे विविध पदार्थ केले जातात. महाराष्ट्रामध्ये सीताफळाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. विशिष्ट चव आणि गोडीमुळे बाजारपेठेत याला विशेष मागणी असते. सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सीताफळापासून आइस्क्रीम, रबडी, श्रीखंड, बासुंदी मिल्कशेक असे विविध पदार्थ केले जातात. सीताफळाचे मूल्यवर्धन  आइस्क्रीम  साहित्य  सीताफळ गर १५० ग्रॅम, साखर १५० ग्रॅम, दूध २५० मिलि, क्रिम ५० ग्रॅम, दूध पावडर, आवडीनुसार सुगंधित द्रव्ये. कृती  प्रथम वरील सर्व सामग्री मिक्सरमधून एकत्रित करून घ्यावी. त्यामध्ये सीताफळाचा गर घालून मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. मिश्रण घट्ट होण्यासाठी ८ ते १० तास फ्रिजमध्ये ठेवावे. तयार आइस्क्रीम चवीला उत्तम लागते. आइस्क्रीम बनवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या अधिक स्निग्धांश असलेल्या म्हशीच्या दुधाचा वापर करावा. रबडी  साहित्य  सीताफळ गर १५०-२०० ग्रॅम, म्हशीचे दूध १ लिटर, साखर १५० ग्रॅम, आवडीनुसार सुगंधित द्रव्ये. कृती  मंद आचेवर १ लिटर दूध अर्धे होईपर्यंत चांगले उकळून घ्यावे. दूध थंड करून त्यामध्ये सीताफळाचा गर, साखर आणि सुगंधित द्रव्ये घालून चांगले एकत्रित करून घ्यावे. तयार मिश्रणावर आवडीनुसार बारीक केलेले काजू, बदाम टाकावेत. मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. रबडीमध्ये साखरेचा वापर कमी करावा, जेणेकरून सीताफळाची नैसर्गिक चव जाणार नाही. श्रीखंड  साहित्य  सीताफळ गर १००-१५० ग्रॅम, चन्ना ४००-५०० ग्रॅम, साखर २००-३०० ग्रॅम, आवडीनुसार इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता. कृती  प्रथम सीताफळ गर, चन्ना आणि साखर चांगले एकत्रित करून घ्यावे. तयार मिश्रण घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. तयार श्रीखंडामध्ये आवडीनुसार इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता इत्यादी टाकावेत. बासुंदी  साहित्य सीताफळ गर ५०-१०० ग्रॅम, म्हशीचे दूध १ लिटर, क्रीम किंवा कंडेन्स्ड दूध २०० ग्रॅम, आवडीनुसार इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता. कृती  मंद आचेवर १ लिटर दूध अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे. त्यामध्ये आवडीनुसार क्रीम किंवा कंडेन्स्ड दूध टाकून चांगले एकत्रित करावे. तयार मिश्रण मंद आचेवर ५ ते १० मिनिटे तापवून घ्यावे. तयार बासुंदी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काढावी. त्यावर इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता टाकून फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवून द्यावे. मिल्कशेक  साहित्य  सीताफळ गर १०० ग्रॅम, दूध अर्धा लिटर, क्रीम ५० ग्रॅम, व्हॅनिला आइस्क्रीम १०० ग्रॅम, दूध पावडर ५० ग्रॅम आणि साखर १०० ग्रॅम. कृती  प्रथम अर्ध्या लिटर दुधामध्ये क्रीम, व्हॅनिला आइस्क्रीम, सीताफळ गर, दूध पावडर आणि साखर टाकून घ्यावी. मिश्रण चांगले एकत्रित करावे. तयार मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. संपर्क - गणेश गायकवाड, ९८५०२३६३८० (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com